agriculture news in Marathi, Thousands of acre land without sowing in Akola District, Maharashtra | Agrowon

अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती नापेर
टीम अॅग्रोवन
रविवार, 15 सप्टेंबर 2019

अकोला ः अनियमित पावसाचा यंदा खरिपाला मोठा फटका बसला असून जिल्ह्यात हजारो हेक्टर जमीन नापेर राहिली. यामुळे शेतकऱ्यांना मोठी झळ सहन करावी लागली. हे क्षेत्र आता आगामी रब्बी हंगामात उपयोगात आणण्यासाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू झाली आहे.

जिल्ह्यात जून व जुलै महिन्यात अपुरा तसेच अनियमित पाऊस झाल्याने झालेल्या पेरण्या उलटल्या. त्यानंतर काहींनी दुबार पेरणी करूनही पिके साधली नव्हती. परिणामी खरीप लागवड क्षेत्र नापेर राहिले. जुलैच्या शेवटी तसेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या चालल्या. आता ही पिके जेमतेम वाढलेली दिसून येत आहेत.

अकोला ः अनियमित पावसाचा यंदा खरिपाला मोठा फटका बसला असून जिल्ह्यात हजारो हेक्टर जमीन नापेर राहिली. यामुळे शेतकऱ्यांना मोठी झळ सहन करावी लागली. हे क्षेत्र आता आगामी रब्बी हंगामात उपयोगात आणण्यासाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू झाली आहे.

जिल्ह्यात जून व जुलै महिन्यात अपुरा तसेच अनियमित पाऊस झाल्याने झालेल्या पेरण्या उलटल्या. त्यानंतर काहींनी दुबार पेरणी करूनही पिके साधली नव्हती. परिणामी खरीप लागवड क्षेत्र नापेर राहिले. जुलैच्या शेवटी तसेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या चालल्या. आता ही पिके जेमतेम वाढलेली दिसून येत आहेत.

अकोला जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यात प्रामुख्याने कटीयार, म्हैसांग, अंबिकापूर, कपिलेश्वर, आपातापा, आपोती आदी गावशिवारात हजारो हेक्टर शेती तशीच पडून राहिली. जिल्ह्यात प्रामुख्याने अकोला, मूर्तिजापूर, पातूर या तालुक्यांमध्ये निर्धारित लक्ष्यापर्यंत पेरण्या होऊ शकल्या नव्हत्या. 

अकोल्याचे सरासरी क्षेत्र एक लाख ६२८० हेक्टर आहे. यावर्षी ८७०९० हेक्टरवर पेरणी झाली. जवळपास २० हजार हेक्टर खरीप क्षेत्र नापेर राहिले. मूर्तिजापूरमध्ये ७३६३३ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ६४ हजार हेक्टरवर लागवड झाली. तर पातूरमध्ये ५२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ४०३२९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. या तीनही तालुक्यांमध्ये सरासरीच्या ९० टक्केही क्षेत्र लागवडीखाली आलेले नाही.

पावसाच्या खंडामुळे पेरणी झालेली पिके मोडून टाकण्याची स्थिती संपूर्ण मूर्तिजापूर तसेच अकोला तालुक्यातील काही मंडळात निर्माण झाली होती. शेतकऱ्यांनी दुबार पेरण्या करूनही पुरेशा ओली अभावी पिके टिकली नव्हती. शेतकऱ्यांनी सरळ नांगर फिरवला. जिल्ह्यात ऑगस्टच्या मध्यापासून पाऊस कसर भरून काढत आहे. सध्या रब्बीच्या दृष्टीने हा पाऊस चांगला ठरणार आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसात हरभऱ्याची लागवड जिल्ह्यात सुरू होण्याची शक्यता आहे. 

अकोला जिल्ह्याचा खरीप दृष्टिक्षेप

सरासरी ४८०५८६
लागवड  ४१९४०१
टक्केवारी ८७

प्रमुख पिकांची लागवड

तूर   ५०९०८ हेक्टर
मूग     १९२८५
उडीद    १३९७३
सोयाबीन    १७०८५८
कापूस   १५४४३३

 

इतर अॅग्रो विशेष
पशुधनवाढीचे विश्लेषण कधी? आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...
आरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...
तळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...
जिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...
वादळी पावसाचा अंदाज कायमपुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
पावसाचा पुन्हा दणकापुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...
सर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...
बहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...