Agriculture news in Marathi Thousands of crores of rupees lost due to heavy rains in Ratnagiri | Agrowon

रत्नागिरीत अतिवृष्टीमुळे हजार कोटींचे नुकसान

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 ऑगस्ट 2021

मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या महापुरासह दरडी कोसळल्यामुळे सुमारे एक हजार कोटींचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान चिपळूण आणि खेड तालुक्यांतील असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रत्नागिरी : मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या महापुरासह दरडी कोसळल्यामुळे सुमारे एक हजार कोटींचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान चिपळूण आणि खेड तालुक्यांतील असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. आतापर्यंत २५ हजार मालमत्तांचे पंचनामे करण्यात आले आहेत.

वशिष्टीच्या पुरामुळे चिपळूण शहर दोन दिवस, तर जगबुडीच्या पुरात खेड शहर पाण्याखाली होते. प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरुवात झाली. बाधितांना मदत करण्यासाठी हजारो लोकांनी हात पुढे केले होते. गेल्या आठ दिवसांत महसूल विभागाची सर्व यंत्रणा पंचनाम्यांसाठी लावण्यात आली होती. त्यामध्ये चिपळूण शहराला मोठा तडाखा बसला आहे. चिपळूण शहरातील ९ हजार २७३ घरांचे, तर ४ हजार ३५९ व्यापाऱ्यांच्या दुकानांचे नुकसान झाले आहे. दोन्ही शहरांबरोबरच संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापूर आणि लांजा तालुक्यातही पूर परिस्थिती होती. पूर्णतः १०६ घरे, अंशतः २ हजार ८१४ घरे, ६७ झोपड्या आणि ३६६ गोठ्यांचा समावेश आहे. चिपळूण तालुक्यातील ०.१० हेक्टरवरील मत्स्य शेतीला पुराचा फटका बसला आहे.

सरकारी मालमत्तेलाही फटका
दरडी कोसळून आणि पुरामध्ये वाहून गेल्यामुळे जिल्ह्यातील ४० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील ३२ व्यक्ती या दोन शहरांतील आहेत. सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, महावितरण, जिल्हा परिषद मिळून २५ हजार मालमत्तांचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे सुमारे ८० कोटींपेक्षा अधिक नुकसान आहे. पुरात महावितरणचे विद्युत खांब, वीजवाहिन्या यांच्यासह ट्रान्स्फॉर्मरचे मिळून ३ कोटी ४५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ११ कुक्कुटपालन शेडसह २१३ शेतकऱ्यांकडील ३ हजार २७४ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. सव्वातीनशे गाई-गुरांचा मृत्यू झाला आहे. चिपळूण शहरातील दुचाकी, चारचाकी गाड्या वाहून गेल्यामुळे नुकसान झाले आहे. सुमारे ५ हजार वाहने बाधित झालेली आहेत. पावणेदोन हजार हेक्टरवरील भातशेती वाहून गेली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १० हजार ५७३ कुटुंबे पात्र ठरली आहेत.

पूर आणि दरडी कोसळून नुकसान झालेल्या मालमत्तांचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्याचा अहवाल शासनाला सादर केला आहे. बाधितांना सानुग्रह अनुदान वाटप केले जात आहे.
- डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी


इतर बातम्या
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
गुन्हा दाखल करण्याऐवजी पुन्हा चौकशीचा...पुणे ः जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली मृद व...
शेतकरी आंदोलन लोकसभा  निवडणुकीपर्यंत...नगर : केंद्रातील भाजप सरकारने ठरविलेल्या...
सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन...अकोला : या हंगामात लागवड केलेले कमी कालावधीचे...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार...अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच...
पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर...नगर : नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर...
वालचंदनगर (जि.पुणे) : लाळ्या खुरकूत...वालचंदनगर, जि. पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून...
सांगली : रब्बीचे पावणे तीन लाख हेक्टरवर...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते,...
खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या ...चंद्रपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना...
सांगलीतील पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी...सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठा ७१.३९ टक्...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी...
नांदेडमधील प्रकल्पांत ८२.५७ टक्के...नांदेड : ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला...
नंदुरबार जिल्ह्यात चार साखर कारखाने...जळगाव : खानदेशात उसाची लागवडदेखील बऱ्यापैकी आहे....
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास...सोलापूर ः ‘‘कृषी योजनांचा अधिकाधिक प्रसार करून...
‘‘हतनूर’मधून ३८८ दशलक्ष घनमीटर पाणी...जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९०...