ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या घरासमोर ठिय्या

कारखान्याने साखर सहसंचालकांना याबाबत पत्र दिले आहे. या महिनाअखेर निम्मी व पुढच्या महिन्यात उरलेली रक्कम शेतकऱ्यांना अदा केली जाईल, अशी हमी दिली आहे. संबंधित शेतकऱ्यांना हा निर्णय मान्य आहे. मात्र, त्यातील काहींना याप्रश्‍नी राजकीय स्टंट करायचा असल्याने हे आंदोलन केले. - विक्रमसिंह पाचपुते, अध्यक्ष, साईकृपा साखर कारखाना
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या घरासमोर ठिय्या
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या घरासमोर ठिय्या

श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या घरापुढे हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्याकडे असणाऱ्या थकीत ऊस बिलासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरच्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. १४) ठिय्या आंदोलन केले. संपलेल्या गळीत हंगामातील गाळपासाठी आलेल्या उसाची बिले थकल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे औरंगाबाद जिल्हा सचिव वाल्मीक शिरसाठ यांनी केला. 

वाल्मीक यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्याकडे थकील ऊस बिलापोटी रक्कम थकली आहे. ती मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे शुक्रवारी शेतकऱ्यांनी पाचपुते व कारखान्याचे अध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांच्या घरासमोर काष्टी येथे आंदोलन केले. 

शिरसाठ म्हणाले, ‘‘कारखान्याच्या अध्यक्षांनी लेखी हमी देऊनही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन हे आंदोलन केले. ``

या आंदोलनात शिरसाठ यांच्यासह खलील शेख, शांतिलाल पल्हारे, प्रभाकर पवार, ज्ञानदेव टेकणे, सिकंदर पटेल, अन्वर पठाण, जावेद शहा, पवन माने, सचिन पटारे, लक्ष्मण कांगुणे, दत्तू शिंदे, शिवाजी बागूल, कडू बरडे सहभागी झाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com