agriculture news in marathi, Thousands of farmers are in front of the house of Pachpute for the sugarcane bills | Agrowon

ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या घरासमोर ठिय्या
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 जून 2019

कारखान्याने साखर सहसंचालकांना याबाबत पत्र दिले आहे. या महिनाअखेर निम्मी व पुढच्या महिन्यात उरलेली रक्कम शेतकऱ्यांना अदा केली जाईल, अशी हमी दिली आहे. संबंधित शेतकऱ्यांना हा निर्णय मान्य आहे. मात्र, त्यातील काहींना याप्रश्‍नी राजकीय स्टंट करायचा असल्याने हे आंदोलन केले. 
- विक्रमसिंह पाचपुते, अध्यक्ष, साईकृपा साखर कारखाना

श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या घरापुढे हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्याकडे असणाऱ्या थकीत ऊस बिलासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरच्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. १४) ठिय्या आंदोलन केले. संपलेल्या गळीत हंगामातील गाळपासाठी आलेल्या उसाची बिले थकल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे औरंगाबाद जिल्हा सचिव वाल्मीक शिरसाठ यांनी केला. 

वाल्मीक यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्याकडे थकील ऊस बिलापोटी रक्कम थकली आहे. ती मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे शुक्रवारी शेतकऱ्यांनी पाचपुते व कारखान्याचे अध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांच्या घरासमोर काष्टी येथे आंदोलन केले. 

शिरसाठ म्हणाले, ‘‘कारखान्याच्या अध्यक्षांनी लेखी हमी देऊनही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन हे आंदोलन केले. ``

या आंदोलनात शिरसाठ यांच्यासह खलील शेख, शांतिलाल पल्हारे, प्रभाकर पवार, ज्ञानदेव टेकणे, सिकंदर पटेल, अन्वर पठाण, जावेद शहा, पवन माने, सचिन पटारे, लक्ष्मण कांगुणे, दत्तू शिंदे, शिवाजी बागूल, कडू बरडे सहभागी झाले. 

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...