सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो हेक्टर शेतीला फटका

जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका खारेपाटण (ता. कणकवली) परिसराला बसला असून या भागातील ५५ हेक्टर भातपीक पाण्याखाली आहे. कापणी केलेले भातपीक देखील पुराच्या पाण्यातून वाहून गेले आहे. दरम्यान सलग तीन झालेल्या संततधारेमुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर भातपिकाचे नुकसान झाले आहे.
Thousands of hectares of agriculture hit in Sindhudurg district
Thousands of hectares of agriculture hit in Sindhudurg district

सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका खारेपाटण (ता. कणकवली) परिसराला बसला असून या भागातील ५५ हेक्टर भातपीक पाण्याखाली आहे. कापणी केलेले भातपीक देखील पुराच्या पाण्यातून वाहून गेले आहे. दरम्यान सलग तीन झालेल्या संततधारेमुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर भातपिकाचे नुकसान झाले आहे.

गेले तीन चार दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. परंतु सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात झाला. दोन दिवसांत तब्बल २३९ मिलिमीटर पाऊस वैभववाडीत तालुक्यात झाला. त्यामुळे या तालुक्यातील सर्वच नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले. तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली. या तालुक्यातील शुक, शांती, करूळ-एडगाव नदी, कुसुर नदी, अरुणा नदी याशिवाय अनेक नाल्यांचे पाणी थेट शुकनदीला मिळून खारेपाटणला जाऊन मिळते. दोन दिवस सतत पाऊस पडल्यामुळे गुरुवारी सकाळपासून खारेपाटण नदीपात्रातील पाणी हळूहळू वाढू लागले. सांयकाळी संपूर्ण परिसर जलमय झाला. खारेपाटण बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पुराचे पाणी भरले.

खारेपाटण नदीचे पाणी खाडीला मिळते. या नदी आणि खाडीपात्रालगत शेकडो हेक्टर भातशेती आहे. या खाडीपात्रालगत काही गावे कणकवली तालुक्यातील आहेत. तर काही गावे राजापूर (जि. रत्नागिरी) तालुक्यातील आहेत. राजापूर तालुक्यातील शेजवली, बांदीवडे, प्रिदांवन, उपळे या गावांतील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर भातशेती नदीकाठी आहे. हे सर्व भातपीक तब्बल २४ तास पाण्याखाली राहिले. त्यामुळे परिपक्व स्थितीतील हे भातपीक पूर्णपणे कुजले आहे. तर कणकवली तालुक्यातील खारेपाटण, वायगंणी, चिंचवली, धालवली, कोर्ले या गावांत सर्व भातशेती पाण्याखाली गेली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com