Agriculture news in marathi, Thousands of hectares protected irrigation area in Hingoli district due to Jalyukt shivar` | Agrowon

``जलयुक्त`मुळे हिंगोली जिल्ह्यात ८४ हजार हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र`
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

हिंगोली : ‘‘जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पूर्ण झालेल्या कामांमुळे ४२ हजार टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ८४ हजार हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झाले आहे,’’ असे प्रतिपादन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

हिंगोली : ‘‘जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पूर्ण झालेल्या कामांमुळे ४२ हजार टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ८४ हजार हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झाले आहे,’’ असे प्रतिपादन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमामध्ये गुरुवारी (ता. १५) सावे बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणी नरवाडे, खासदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री मुटकुळे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, पोलिस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मनियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

सावे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील २ लाख ८२ हजार शेतकऱ्यांनी २ लाख ३५ हेक्टरवरील पिकांसाठी सुमारे ९० कोटी रुपयांचा पीकविमा उतरविला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६६ हजारहून अधिक शेतकऱ्यांना २६७ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. या अभियानामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाश्वत पाणी आणि शेतीकरिता सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. २०१६ ते २०१९ या कालावधीत एकूण ४१९ गावांची निवड झाली.’’

‘‘मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत ३ हजार ५५७ शेततळे पूर्ण करून उद्दिष्टपूर्ती केली. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत ११ अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना ४३ एकर शेतीचे वितरण करण्यात आले. राज्यातील कोल्हापूर सांगलीसह पाच जिल्ह्यांमध्ये महापुरामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळित झाले आहे. शासनातर्फे पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मदत करावी,’’ असे आवाहनही सावे यांनी केले.

इतर बातम्या
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी...सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा...
मागण्या मंजूर झाल्याने ग्रामसेवकांचे...अकोला  ः विविध मागण्यांसाठी राज्यात २२...
उदयनराजे भोसले यांचा अखेर भाजपमध्ये...नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे...
अनुदान अर्जांना १०० टक्के पूर्वसंमती...पुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांमधील...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशी विश्रांती घेतल्यानंतर अरबी...
कीडनाशके विक्री पात्रतेचा तिढा सुटलापुणे : देशात कीडनाशके विक्रीसाठी शैक्षणिक...
‘अमूल’कडून राज्यात कडवे आव्हानपुणे : राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत...
औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा...सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके...
मॉन्सूनचा मुक्काम लांबणारपुणे : निम्मा सप्टेंबर उलटूनही परतीच्या...
वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार...पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात...
अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती नापेरअकोला ः अनियमित पावसाचा यंदा खरिपाला मोठा फटका...
नाशवंत शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी...पुणे : राज्यातील नाशवंत शेतमालाचे काढणीपश्‍चात...
भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे शेकडो हेक्‍...भंडारा ः मध्य प्रदेशातील संततधारेमुळे जिल्ह्यात...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
`कांदा आयातीचे धोरण शेतकऱ्यांना...पुणे  : कांदा आयात करण्याचे केंद्र सरकारचे...
स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली,...वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे...
जळगाव जामोद येथे फिरते मासळी विक्री...बुलडाणा  : मत्स्यव्यवसाय आणि नियोजन...
कृषी विज्ञान केंद्र मालेगावकडून...नाशिक : कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव महाराष्ट्र...
साठवणीसाठी खरेदी नसल्याने चीनमध्ये...चीनी आहारामध्ये लसणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत...
अकोला जिल्हा बँकेची पूरग्रस्तांना १६...अकोला  ः सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील...