agriculture news in Marathi, thousands of home damage in Sangali, Maharashtra | Agrowon

सांगलीत हजारो घरांची पडझड

टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

सांगली : महापुरासह अतिवृष्टी झालेल्या शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्‍यांतील गावांमध्ये सुमारे ५०० हून अधिक घरे जमीनदोस्त झाली असून, ती कुटुंब बेघर झाली आहेत. याशिवाय पाच तालुक्‍यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे किमान दीड हजारांवर घरांची पडझड झाली आहे. 

सांगली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेला पावसामुळे कृष्णा-वारणा नदीकाठाशेजारी अनेक गावे पाण्याखाली गेली होती. बहुतांश गावांत अजून पाणी आहे. आठ दिवस पाणी असल्याने जुनी मातीची घरे पडू लागली आहेत. तिच स्थिती सांगली शहरात दिसते आहे. 

सांगली : महापुरासह अतिवृष्टी झालेल्या शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्‍यांतील गावांमध्ये सुमारे ५०० हून अधिक घरे जमीनदोस्त झाली असून, ती कुटुंब बेघर झाली आहेत. याशिवाय पाच तालुक्‍यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे किमान दीड हजारांवर घरांची पडझड झाली आहे. 

सांगली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेला पावसामुळे कृष्णा-वारणा नदीकाठाशेजारी अनेक गावे पाण्याखाली गेली होती. बहुतांश गावांत अजून पाणी आहे. आठ दिवस पाणी असल्याने जुनी मातीची घरे पडू लागली आहेत. तिच स्थिती सांगली शहरात दिसते आहे. 

सांगलीचा महापूर आता जवळपास ओसरला असून कृष्णा नदीची पाणीपातळी आता कमी झाली आहे. गेल्या तीन दिवसात १३ फूट पाणी पातळी कमी झाली आहे. सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी ४५ फुटावर गेली आहे. पूर जरी ओसरत असला ग्रामीण भागात जाणारे सुमारे १७ ते १८ ठिकाणाचे मार्ग बंद आहेत. सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थितीमुळे राज्य परिवहन महामंडळाचे अनेक मार्ग बंद करण्यात आले होते. त्यामुळे बस वाहतूक बंद केली होती. सांगलीमधून पुणे औरंगाबादला जाणाऱ्या बससेवा सुरू केल्या असून जिल्ह्यासह बाहेरीज जिल्ह्याशी जाणारे वीस मार्गावरून बससेवा सुरळीत झाली आहे.

मिरज-पुणे रेल्वेसेवा सुरू झाली असली तरी मोठ्या संख्येने गाड्या बंदच आहेत. महापुरामुळे आणि मुंबई-पुणेदरम्यानच्या मेगाब्लॉकमुळे बहुतांश एक्स्प्रेस गाड्या विविध स्थानकांत अडून पडल्या आहेत. रुकडीजवळ लोहमार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद आहे. त्यामुळे कोल्हापूर ते पुणे रेल्वेसेवा तूर्त बंदच आहे. रुकडीजवळ रुळांखालील खडी वाहून गेली आहे. रेल्वेचे अधिकारी बॉबीयन यंत्राद्वारे खडी पसरण्याचे काम करत आहेत. त्यानंतर पंचगंगेच्या पुलाची चाचपणी करून गाड्या सुरू केल्या जातील.


इतर अॅग्रो विशेष
भांडवली शेतीचा विळखा बघता बघता हरितक्रांतीला पन्नास वर्षे झाली. तसे,...
पशुखाद्य : नियोजन अन् नियंत्रणमहाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...
धानासाठी क्विंटलला पाचशे रुपये अनुदानमुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
‘पीजीआर’ला मान्यतेचा मार्ग मोकळापुणे ः देशभरात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिगर...
इथेनॉलसाठी मान्यता; पण प्रकल्पांसाठी...पुणे  : थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळखनंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या...
उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे...
परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून...पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे...
किरकोळ व्यापाऱ्यांकरिता कांदासाठा...मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...