Agriculture news in marathi Thousands of mango and cashew trees sprouted in the forest | Agrowon

२५ एकरावरील आंबा, काजूची हजार झाडे वणव्यात होरपळली

टीम अॅग्रोवन
सोमवार, 7 डिसेंबर 2020

वणव्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील मालगुड, निवेंडी, चाफे, कळझोंडी परिसरातील आंबा, काजूची एक हजार झाडे होरपळली आहेत. यामध्ये चार शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. २५ एकरचा परिसर भस्मसात झाला 

रत्नागिरी  : अचानक लागलेल्या वणव्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील मालगुड, निवेंडी, चाफे, कळझोंडी परिसरातील आंबा, काजूची एक हजार झाडे होरपळली आहेत. यामध्ये चार शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले; मात्र तोपर्यंत २५ एकरचा परिसर भस्मसात झाला होता.

चाफे, निवेंडी-धनगरवाडी, कळझोंडी या परिसरात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वणवा लागला. वारा आणि वाळलेल्या गवतामुळे आग वेगाने पसरत गेली. आंबा, काजू कलमांच्या बागा होरपळत होत्या. बागायतदार आणि स्थानिक ग्रामस्थ आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र वणवा पसरत गेल्यामुळे तो नियंत्रणाच्या बाहेर गेला.

या आगीत आंबा-काजू कलमे होरपळताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. सुमारे पाच तास हे आगीचे तांडव सुरू होते. अखेर चार वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात सर्वांना यश आले. यामध्ये सुमारे ६१० आंब्यांची कलमे, तर २८० काजू कलमे होरपळून गेली आहेत. ऐन आंबा हंगामात बागायतदारांवर मोठा संकट कोसळले आहे.
 
निवेंडीतील भूपेंद्र महादेव भोजे यांची १५० आंबा कलमे १०० काजू, पंप, पाईप वायरिंग जाळून खाक झाले. बाबाजी रामचंद्र कोकरे यांची ७० कलमे, ८० काजू, भगवान मांब्या कोकरे यांची ८९ कलमे १०० काजूची तर भालचंद्र भिकाजी नलावडे यांची ३०० कलमे आणि  पंप, वायरिंग तर लक्ष्मण येडगे यांचा पंप आणि वायरिंग जळून खाक झाली. वणव्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मालगुंड पोलिस ठाण्यात याची नोंद झाली असून, कृषी विभागातर्फे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.

प्रतिक्रिया
अनेक वर्षे सांभाळलेली आंबा, काजू कलमे डोळ्या देखत होरपळत होती. पण आम्हाला काहीच करता येत नव्हते. ही मनाला वेदना देणारी घटना आहे. जिल्हा प्रशासन आणि वन विभागाने याची दखल घेऊन भरपाई द्यावी.
-बाबाजी कोकरे, आंबा बागायतदार. निवेंडी.
 


इतर अॅग्रो विशेष
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...
सांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू...
पीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान...पुणे ः राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने...
कोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही...
तेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...
शेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी संसद दणाणली;...नवी दिल्ली ः संसदेत गुरुवारी (ता.२२) शेतकरी...
‘शेतकरी संसदे’त कृषी कायद्यांवर हल्लाबोलनवी दिल्ली  : जंतर-मंतर येथे संयुक्त किसान...
महाबळेश्वरात ४८० मिलिमीटर पाऊस !!!सातारा ः महाबळेश्वरात मुसळधार पाऊस सुरू आहे....
रत्नागिरीत पावसाचे थैमानरत्नागिरी ः जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारख्या...
‘मुळशी’च्या पाणलोट क्षेत्रात ३७०...पुणे ः जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीरसिंधुदुर्गनगरी ः जिल्हयात मध्यरात्रीपासून...
मराठवाड्यात तब्बल ७७ मंडलात अतिवृष्टी औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता.२२)...
सोमवारपर्यंत ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा...पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकणासह, मध्य...
राज्यात अतिवृष्टीने दाणादाण पुणे : कोकणातील सर्वंच जिल्ह्यांसह राज्यातील काही...
राज्याची कृषी विधेयके लोकाभिप्रायासाठी...पुणे ः महाविकास आघाडी सरकारने नव्या कृषी...
लॉन’ शेतीत मिळवली चांदे गावाने ओळखपुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध...