मजूर बाजारात हजारोंना दररोज मिळतो रोजगार येथे... 

गिरणारे येथे खंडेराव डोंगराच्या पश्‍चिमेस सकाळी ६ ते सकाळी ८ दरम्यान मजूर बाजार भरतो. या बाजारात २५ हजारांहून अधिक मजुरांना शेतीतून तब्बल ६ महिने अखंडित रोजगार उपलब्ध होतो.
मजूर बाजारात हजारोंना दररोज मिळतो रोजगार येथे... 
मजूर बाजारात हजारोंना दररोज मिळतो रोजगार येथे... 

गिरणारे, ता. नाशिक : नाशिक तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील गिरणारे येथे खंडेराव डोंगराच्या पश्‍चिमेस सकाळी ६ ते सकाळी ८ दरम्यान मजूर बाजार भरतो. या बाजारात २५ हजारांहून अधिक मजुरांना शेतीतून तब्बल ६ महिने अखंडित रोजगार उपलब्ध होतो. येथून मजूर नाशिक, सिन्नर, निफाड, दिंडोरी, त्रंबकेश्‍वर तालुक्यातील शेतीकामासाठी जात असतात. एकूणच टोमॅटो लागवड ते टोमॅटो काढणीपर्यंत तसेच द्राक्ष बागाच्या हंगामी कामांसाठी शेतकऱ्यांना शेतमजूर उपलब्ध होतात. 

गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या काळात २ वर्षे शेतमजुरांना रोजगार नव्हता. पेठ तालुक्यासह त्रंबकेश्‍वर तालुक्यातील हरसूल, ठाणापाडा, खरशेत ते थेट गुजरात सीमेवरील गावचे मजूर कामासाठी गिरणारेच्या मजूर बाजारात येतात. दिवसेंदिवस हा मजूर बाजार वाढत असून सध्या गिरणारेच्या मजूर बाजारात २५ हजाराहून अधिक आदिवासी भागातील नागरिक रोजगारासाठी गिरणारेच्या मजूर बाजारात पहाटे पहाटे येतात. मजुरांची रोजंदारी ठरल्यावर शेतकरी स्वतःच्या चारचाकी वाहनांतून शेतापर्यंत मजुरांना घेऊन जातात. सध्या टोमॅटो खुडणीसाठी मोठ्या प्रमाणात शेतमजुरांना मागणी आहे. 

दिवाळीच्या सणात मजूर नसल्याने रोजंदारी दुप्पट करूनही मजूर भेटत नव्हते. आता टोमॅटो खुडणीसाठी महिलांना ३०० रुपये ते ३५० रुपये, तर पुरुषास ३५० ते ४५० रुपये रोजंदारी मिळत आहे. बांधकाम बिगाऱ्यास ५०० ते ७०० रुपये तर गवंडी यास ७०० ते ९०० रुपये रोजंदारी मिळते. यामुळे वाढती शेतमजुरीमुळे शेतीचा उत्पादन खर्च व उत्पन्नाचा मेळ बसत नाही, असे शेतकरी सांगतात.     स्थानिक गावात मजूर मिळेना  एकीकडे गिरणारेस खात्रीने रोजगार मिळतो म्हणून येथे त्रंबकेश्‍वर, पेठ तालुक्यातून मजूर येतात. मात्र स्थानिक पातळीवर भात, नागली, वरई, उडीद सोंगणीसाठी मजूर मिळत नाही. फलोत्पादन घेणारे शेतकरी अधिक मजुरी देत असल्याने आम्हीच स्थानिक शेतकरी मजुरांची उपलब्धता करण्यात अडचणीत असल्याचे गणेशगाव (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील पोलिस पाटील शेतकरी देवचंद महाले यांनी सांगितले. 

प्रतिक्रिया... येण्या-जाण्याचा प्रवास खर्च १०० रुपये असतो. त्यात मजुरी मिळते ४०० रुपये हातात केवळ ३०० रुपये पडतात. मोठी दगदग, पहाटे ५ वाजता घरातून निघावे लागत, या महागाईत घर खर्चासाठी आम्हाला मजुरीशिवाय पर्याय नाही. रस्त्याच्या कडेला उभे राहतो, तिथे निवारा ना पिण्यासाठी पाणी. मात्र रोजगार हक्काचा मिळतो इतकेच समाधान.  - सुभाष सहाळे, शेतमजूर  शेती व मजुरी हे समीकरण होऊन बसलं आहे. मजुरी शिवाय शेती होत नाही. घरातील माणसे किती राबणार? टोमॅटो लागवड ते काढणीपर्यंत मजूर लागतो. जितका उत्पादन खर्च त्याचा अर्धा खर्च मजुरीस लागतो. २ वर्षे शेतीमालाला भाव नव्हता, देणी फिटत नव्हती, यंदा  बरा भाव आहे. त्यामुळं डोक्यावरील ओझं खांद्यावर आलं आहे.  -विलास दगू थेटे, टोमॅटो उत्पादक शेतकरी 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com