Agriculture news in marathi, Thousands of quintals of soybeans in the market | Page 2 ||| Agrowon

वऱ्हाडात सोयाबीनची बाजारात हजारो क्विंटल आवक

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021

अकोला ः वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये दररोज सोयाबीनची आवक वाढत आहे. सरासरी चार ते पाच हजारांदरम्यान दर मिळत आहे. वाशीम, खामगाव बाजार समित्यांमध्ये दर दिवसाला सात ते आठ हजार पोत्यांची आव आहे. अकोल्यातही दीड हजार पोत्यांवर आवक पोचली आहे. 

अकोला ः वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये दररोज सोयाबीनची आवक वाढत आहे. सरासरी चार ते पाच हजारांदरम्यान दर मिळत आहे. वाशीम, खामगाव बाजार समित्यांमध्ये दर दिवसाला सात ते आठ हजार पोत्यांची आव आहे. अकोल्यातही दीड हजार पोत्यांवर आवक पोचली आहे. 

सध्या सोयाबीन काढणीला वेग आला आहे. तयार झालेला माल थेट बाजार समित्यांमध्ये येत आहे. यामुळे सोयाबीनमध्ये आर्द्रतेचे प्रमाणही २५ पर्यंत असल्याचे सांगितले जाते. या दर्जाचा माल चार हजारांपर्यंत विकला जात आहे. चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला ४८०० ते ५१०० दरम्यान भाव मिळत आहे.
गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे नुकसान झाले. अनेकांचा शेतीमाल ओला झाला. आता पाऊस थांबल्यानंतर सोयाबीन मळणीने वेग घेतला.

तयार झालेले सोयाबीन अनेक जण तसेच विकून मोकळे होत आहेत. गावखेड्यात सोयाबीनची खरेदी ३५०० पासून ते ४५०० हजारांदरम्यान व्यापारी करीत आहेत. सोयाबीनमध्ये जितका ओलावा असेल, तितक्या प्रमाणात दर कमी होत आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी वाढलेले सोयाबीनचे दर पाच हजारांपर्यंत घसरले. त्यामुळे अनेक शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. येत्या आठवड्यात सोयाबीनची आवक आणखी वाढेल. दिवाळीपूर्वीच बाजार सोयाबीनच्या पोत्यांनी भरू लागले आहेत. गुरुवारी (ता. २१) खामगाव बाजार समितीत जवळपास आठ हजार पोत्यांची आवक होती.

वाशीममध्ये बुधवारी (ता. २०) सोयाबीनची ७८९५ क्विंटलची उलाढाल झाली. अकोल्यात १९८० पोत्यांची आवक होऊन ४२०० ते ४९०० दरम्यान दर भेटला. कारंजा, मूर्तिजापूर, अकोट, चिखली, मेहकर, देऊळगावराजा, शेगाव, बाजार समित्यांमध्ये दररोज आवक वाढत आहे. 


इतर बातम्या
पुसदमध्ये ५००० क्विंटल कापसाचीच खरेदीआरेगाव, जि. यवतमाळ : यंदा सुरवातीपासूनच कापसाला...
धुळे : सोयाबीन बीजोत्पादनात सहभाग...धुळे : ‘‘उन्हाळी हंगाम २०२१-२२ मध्ये महाबीज...
नाशिकः २०२४ पर्यंत प्रति दिन,प्रति...नाशिकः ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत ‘हर घर नल से जल’...
खानदेशात गहू पेरणीला आला वेग जळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस काहीसे कोरडे...
नांदेड जिल्ह्यात साडेतीन लाख शेतकरी...नांदेड : ई-पीक पाहणी प्रकल्पातंर्गत पीक पेरा...
नांदेडमध्ये सोयाबीनला साडेसहा हजारांचा...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत...
तुर्कांबाद खराडीत करारावर बटाटा...औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यातील...
शेतकऱ्यांनो एकरकमी भरा अर्धेच वीजबिल ः...नगर : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे धोरण...
राज्याच्या किमान तापमानात घट पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर आकाश...
शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे -...लातूर ः आज देशात गहू, तांदूळ, मका आणि साखर अधिकची...
शिंदीच्या झाडांचे आता जिओ टॅगिंग  नीरा...नागपूर ः राज्य शासनाने नीरा देणाऱ्या शिंदीच्या...
कंटेनर भाड्यात पाच पट वाढ नागपूर ः टाळेबंदीमुळे अमेरिका आणि युरोपियन देशात...
विमा योजनेकडे ७० टक्के शेतकऱ्यांनी...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कापड उद्योगाला खुपतोय कापसाचा दर पुणे : तमिळनाडूतील राजकीय पक्ष तसेच कापड...
काँग्रेसचे सतेज पाटील, भाजपचे अमरिश...मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या ६ जागा...
नाशिकमध्ये द्राक्ष परिषद घेणार : राजू...नाशिक : द्राक्ष पिकात शेतकरी कष्टातून उत्पादन घेत...
नगर जिल्ह्यात रब्बी पेरणीचा टक्का कमीचनगर ः जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला अजूनही फारसा...
ई-पीक पाहणीचा पहिला टप्पा यशस्वीपुणेः देशातील पहिल्याच ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या...
किन्ही येथे धान पुंजणे जाळल्याने आठ...भंडारा ः साकोली तालुक्‍यातील किन्ही येथे १९...
पालघरचा मंजूर विकासनिधी सातव्यांदा...पालघरः मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्याच्या...