सहा तास रांगेत लागून मिळतात हजार रुपये

सहा तास रांगेत लागून मिळतात हजार रुपये
सहा तास रांगेत लागून मिळतात हजार रुपये

अमरावती  ः आपल्याच खात्यातील पैसे काढण्यासाठी सहा ते आठ तास रांगेत उभे राहावे लागते. त्यानंतरही हातात केवळ हजार ते दोन हजार रुपयेच ठेवले जातात, असा अनुभव दुर्गम मेळघाटातील बॅंक खातेदारांनी सांगताच खासदार नवनीत राणा यांचा पारा चढला. खासदार नवनीत राणा यांचा मेळघाटातील चुरणी येथे जनता दरबार होता. गावात येताच अलाहाबाद बॅंकेसमोर १०० ते १५० आदिवासींची रांग त्यांना दिसली. हा सर्व प्रकार पाहून खासदारांनी शाखा व्यवस्थापकाला याबाबत विचारणा केली. २५ ते ३० खेडे संलग्न असलेल्या या बॅंकेशी २७ ते ३० हजार खातेदार जोडलेले आहेत. शिपायासह केवळ तीन कर्मचारी ग्राहक सेवेकरिता असून रोकड केवळ आठवड्यातून एकदाच येते, असे सांगण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या खासदार नवनीत राणा यांनी तत्काळ नागपूर येथील बॅंक व्यवस्थापनाशी संपर्क साधत त्यांना चांगलेच धारेवर धरले. दुर्गम आदिवासी बॅंक खातेदारांची ही थट्टा असल्याचे सांगत हा प्रश्‍न तातडीने सोडविण्याचे बजावले.  आदिवासी बॅंक खातेदारांप्रती असलेल्या या धोरणाविषयी आपण लोकसभा अधिवेशनात प्रश्‍न मांडणार असल्याचेही खासदार राणा यांनी सांगितले. त्यानंतर हादरलेल्या बॅंक प्रशासनाकडून अवघ्या दोन तासात एका कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती चुरणी शाखेत करण्यात आली. रोकडचाही प्रश्‍न सोडविणार असल्याची माहिती बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. 

मेळघाटातील दुर्गम भागात अनेक समस्या आहेत. त्या जाणता याव्या याकरिता जनता दरबार घेण्यात येतो. या समस्यांच्या सोडवणुकीसाठी आता लोकसभा अधिवेशनात मुद्दे उपस्थित केले जातील. - नवनीत राणा, खासदार  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com