agriculture news in Marathi threat increased of cotton by heat Maharashtra | Agrowon

उन्हासोबतच वाढली घरातील कापसाची जोखीम 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर त्यांचे सचिव विकास खार्गे यांनी देखील कापूस खरेदीबाबत अनुकूलता दर्शविली. त्यानंतर यवतमाळसह अनेक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी खरेदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कापूस खरेदी व्हावी, असा आमचा आग्रह आहे 
- किशोर तिवारी, अध्यक्ष, (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन 

नागपूर ः कापूस खरेदी केंद्रावरील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची कोरोना विषाणूंपासून सुरक्षा तसेच केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन कठीण असल्याचे सांगत महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ तसेच सीसीआयने कापूस खरेदीबाबत असमर्थता व्यक्‍त केली आहे. उन्हाचा चटका वाढत असल्याने शिल्लक ८० लाख क्‍विंटल कापसाची जोखीम देखील वाढली आहे. 

महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघाने खरेदीबाबत असमर्थता व्यक्‍त केली आहे. एका जिनींगमध्ये ५० ते ७० कर्मचारी राहतात. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन अशा ठिकाणी होणे नाही. त्यामुळे कापूस खरेदीसाठी अधिकृत नियमावली किंवा शासन आदेश प्राप्त होत नाहीत तोवर खरेदी शक्‍य नसल्याचे पणन महासंघाने थेट म्हटले आहे. जिनींगमधील बहुतांश मजूर लॉकडाऊनमुळे यापूर्वीच आपल्या गावी परतला आहे. मजुराअभावी कापूस प्रक्रिया होणार नाही. खरेदी केलेल्या कापसावर तत्काळ प्रक्रिया न केल्यास मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्‍यता आहे. 

कापूस खरेदी करतेवेळी एकमेकांच्या संपर्कात आल्याने केंद्रावरील कर्मचारी, मजूर बाधीत झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना देखील धोका संभवतो. गावस्तरावर देखील बाधीतांची संख्या यामुळे वाढण्याची भिती आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास किंवा शासनाने आदेश दिल्यास कापूस खरेदी सुरु केली जाईल, असे पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख व उपाध्यक्ष विष्णुपंत सोळंके यांनी सांगितले. 

तीन ठिकाणी प्रशासनाचा पुढाकार 
राज्यात नांदेड, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांकडून खरेदी सुरु करण्याचे आदेश सीसीआय व पणन महासंघाला देण्यात आले आहे. नांदेड आणि चंद्रपूरमध्ये स्थानिक प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची जबाबदारी स्वतःवर निश्‍चीत केली आहे. शेतकऱ्यांची आधी नोंदणी करुन रोज दहा गाड्यांची खरेदी येथे केली जाणार आहे. यवतमाळमध्ये या मुद्यावर एकमत होत नसल्याने अनिश्चितता आहे. 

अशी आहे स्थिती 
कापूस लागवड क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) 
महाराष्ट्र ः
४३.८४ लाख 
विदर्भ ः १८ लाख 
मराठवाडा व खानदेश ः २.६ लाख 

शिल्लक कापूस (क्‍विंटल) 
राज्यात ः
७८ ते ८० लाख 
विदर्भ ः २७ ते ३० लाख 
मराठवाडा व खानदेश ः ४८ ते ५० लाख 

ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ गोविंद वैराळे यांनी सुचविलेले उपाय 

  • कापूस विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीचा पर्याय 
  • नोंदणी करताना शेतकऱ्यांची वैयक्‍तिक माहिती व शिल्लक कापसाची नोंद घेणे. 
  • नोंदणी झाल्याबाबतचा एस.एम.एस. संदेश शेतकऱ्याला मिळावा. 
  • एका खरेदी केंद्रावर २० ते ४० वाहनांची मर्यादा असावी. 
  • २५ वाहने आल्यास वाहन चालक, शेतकरी याप्रमाणे दोघे अपेक्षीत धरल्यास ५० व्यक्‍ती होतील. 
  • जिनींग फॅक्‍टरीचा परिसर चार ते पाच एकराचा असतो. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्‍य. 
  • जिनींग परिसरात संपूर्ण सॅनीटायझरची सोय. 
  • वाहनातून कापूस काढण्यासाठी ६ मजुरांची गरज भासते. त्यांच्यामध्ये सामाजिक अंतर पाळावे. 
  • एफ.एफ.क्‍यु. दर्जाच्या कापसाला ५५५० रुपयांचा भाव आहे. परंतु शिल्लक एकूण ८० लाख क्‍विंटलपैकी १५ ते २० टक्‍के कापूस त्या दर्जाचा नाही. त्यामुळे नवीन ग्रेड ठरवीत, दर निश्‍चीत करण्याची गरज आहे 

इतर अॅग्रो विशेष
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...