राष्ट्रपती राजवटीची धमकी हा महाजनादेशाचा अपमान : संजय राऊत

राष्ट्रपती राजवटीची धमकी हा महाजनादेशाचा अपमान : संजय राऊत
राष्ट्रपती राजवटीची धमकी हा महाजनादेशाचा अपमान : संजय राऊत

मुंबई : ‘‘राष्ट्रपती राजवटीची धमकी हा महाजनादेशाचा अपमान आहे. राष्ट्रपती कोणी व्यक्ती नाही. ते देशाचे एक स्तंभ आहेत. राष्ट्रपतींना या गोंधळात आणून त्यांच्या पदाची प्रतिष्ठा घालवू नका. राष्ट्रपती कुणाच्या खिशात नाही, त्यांचा मान ठेवा. अशा प्रकारचं वक्तव्य करणे अत्यंत चुकीचं आहे,’’ अशा शब्दांत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपती राजवट लागू होण्याबाबतच्या भाजपच्या वक्तव्यावर टीका केली आहे.  ‘आठवडाभरात राज्यात सरकार स्थापन न झाल्यास राज्याची सर्व सूत्रे राष्ट्रपतींच्या हाती जाऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते’, असे विधान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. त्याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, ‘‘राष्ट्रपती कुणाच्या खिशात नाहीत. संसदीय लोकशाहीचे नियम आणि पेच आम्हालाही कळतात, तेव्हा राष्ट्रपती राजवटीची भाषा का होते? सत्तास्थापनेला विलंब होणे हे काही नवीन नाही, त्यामुळे त्यांनी राष्ट्रपती राजवटीची धमकी देऊ नये, तुमचे सर्व कारस्थान अपयशी ठरल्यामुळे ते अशी भाषा करत आहेत, हे नवनिर्वाचित आमदारांना घाबरवण्यासाठी आहे का, मराठी माणूस याला घाबरत नाही.’’ मुहूर्त काढून सत्ता होत असेल तर मला आनंद आहे; पण सत्तास्थापनेचा मुहूर्त असायला हवा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. ज्यांच्याकडे बहुमत असेल त्यांची सत्ता स्थापन होईल, त्याला कुणीही रोखू शकत नाही. शरद पवारांची विरोधी पक्षाची भूमिका योग्यच आहे. चर्चा सुरू झाली होती, हे चुकीचं आहे, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं.  १४५ चा आकडा दाखवा सरकार स्थापन करण्यास विलंब होण्याची ही पहिलीच वेळ नाही. कुणी जर सरकार स्थापन करणार असेल तर त्याने १४५ चा आकडा दाखवावा. बहुमताचा मुहूर्त महत्त्वाचा आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com