सरकार पाडण्यासाठी धमकाविले जातेय : राऊत

‘राज्यातील सरकार पाडण्यासाठी मला धमकावले जात आहे. या महाविकास आघाडी सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही,’ असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (ता. २८) केला.
सरकार पाडण्यासाठी धमकाविले जातेय : राऊत Threats to overthrow government: Raut
सरकार पाडण्यासाठी धमकाविले जातेय : राऊत Threats to overthrow government: Raut

मुंबई : ‘राज्यातील सरकार पाडण्यासाठी मला धमकावले जात आहे. आमदारांच्या नावांची यादी दाखवून यांना केंद्रीय यंत्रणा ताब्यात घेईल, अशी धमकी दिली जात आहे. ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाने काय करायच ते करावे. दहशतवादी गँगही वापरा. मात्र, या महाविकास आघाडी सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही,’ असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (ता. २८) केला.  शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. या विषयी संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. राऊत म्हणाले, ‘‘ईडीची नोटीस आमच्यासाठी मोठा विषय नाही. आम्ही कोणालाही घाबरत नाही. हिम्मत असेल तर समोरासमोर लढा. भाजप विरोधकांना त्रास देण्यासाठी सीबीआय, ईडीचा वापर करीत आहे.  वैफल्य, हतबलता यातून ही कारवाई करण्यात आली आहे. ईडी हा भाजपचा पोपट आहे. आमच्यासाठी ईडी हा काही महत्वाचा विषय नाही. सीबीआय, ईडी, आयकर विभाग यांना कधी काळी महत्त्व प्राप्त झाले होते. तिन्ही संस्थामध्ये गांभीर्य राहिले नाही, मात्र, आता ईडीची कारवाई म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने आपली भडास काढणे, हे लोकांनी गृहीत धरले आहे. राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही. म्हणून अशी हत्यारे वापरावी लागतात.’’  दहा वर्षांनंतर ईडीला जाग? वर्षा राऊत यांनी घर घेण्यासाठी ५० लाखांचे कर्ज मैत्रिणीकडून घेतले आहे. या संदर्भात चौकशी करण्यासाठी दहा वर्षांनंतर ईडीला जाग आली आहे का, असा सवाल त्यांनी केला. तसेच आम्ही ईडीला कागदपत्रे वेळोवेळी पुरवली आहेत. आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे तुम्हाला घाबरावे लागेल. माझ्यासोबत पंगा घेऊ नका. मी नंगा आहे. मी जर तोंड उघडले, तुम्हाला देश सोडून जावे लागेल. मुलांबाळावर हल्ले करणाऱ्यांना नामर्द म्हणतात. असा नामर्दपणा कोणी करीत असेल. तर त्यांना शिवसेना त्याच पद्धतीने उत्तर देईल. बायकांच्या पदराआडून खेळी खेळण्यात येत आहे. ही खेळी त्यांच्यावर उलटणार आहे. आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवले आहे की, मैदानात मुलांना बायकांना आणायचे नाही, असेही राऊत म्हणाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com