गतर्षीच्या तुलनेत साडेतीनशे  कोटीने कमी कर्जवाटप 

यंदाच्या (२०२१-२२) खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंकांना १ हजार २१३ कोटी २२ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात १ लाख ६ हजार ५९९ शेतकऱ्यांना ७४१ कोटी १७ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या ६१.०९ टक्के वाटप करण्यात आले.
गतर्षीच्या तुलनेत साडेतीनशे  कोटीने कमी कर्जवाटप  Three and a half hundred compared to last year Crore less loan disbursement
गतर्षीच्या तुलनेत साडेतीनशे  कोटीने कमी कर्जवाटप  Three and a half hundred compared to last year Crore less loan disbursement

परभणी : यंदाच्या (२०२१-२२) खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंकांना १ हजार २१३ कोटी २२ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात १ लाख ६ हजार ५९९ शेतकऱ्यांना ७४१ कोटी १७ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या ६१.०९ टक्के वाटप करण्यात आले. गतवर्षीपेक्षा यंदा ३५१ कोटी २३ लाख रुपये एवढे कमी वाटप झाले आहे.  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आणि महाराष्ट्र ग्रामीण बॅँकांनी उद्दिष्टपूर्ती केली. परंतु गतवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीयकृत तसेच खासगी बॅँकांनी कर्जवाटपात हात आखडताच घेतला. कर्जमाफी, ऋण समाधान योजनांचा घोळ अजून, मिटलेला नसल्यामुळे असंख्य शेतकरी पीककर्जापासून वंचित राहिले आहेत. सलग दुसऱ्या वर्षी एकूण पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट अपूर्णच राहिले आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत (वाणिज्यिक) बॅंकांना ७८१ कोटी ५८ लाख रुपये, खासगी बॅंकांना १०१ कोटी १८ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला १८७ कोटी ६३ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला १४२ कोटी ८३ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. यंदा राष्ट्रीयकृत बॅंकांनी आजवर ३३ हजार ८७० शेतकऱ्यांना ३३२ कोटी ९२ लाख रुपये (४२.६० टक्के) वाटप केले. त्यात १३ हजार ३९६ शेतकऱ्यांनी १२८ कोटी ५९ लाख रुपयांच्या कर्जाचे नूतनीकरण केले असून, नवीन २० हजार ४७४ शेतकऱ्याना २०४ कोटी ४७४ रुपयाचे वाटप करण्यात आले. खासगी बॅंकांनी १ हजार ९०४ शेतकऱ्यांना २२ कोटी ३६ लाख रुपये (२२.१० टक्के) कर्ज वाटप केले. त्यात ९५६ शेतकऱ्यांनी ८ कोटी ६८ लाख रुपयांच्या कर्जाचे नूतनीकरण केले असून, नवीन ९४८ शेतकऱ्यांना १३ कोटी ६८ लाख रुपयाचे वाटप केले. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने २७ हजार २७८ शेतकऱ्यांना २२९ कोटी २५ लाख रुपये (१२२.१८ टक्के) वाटप केले. त्यात १६ हजार ५५४ शेतकऱ्यांनी १४७ कोटी ४७ लाखांच्या कर्जाचे नूतनीकरण करून घेतले असून, नवीन १० हजार ७२४ शेतकऱ्यांना ८१ कोटी ७८ लाख रुपयांचे वाटप केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने ४३ हजार ५४७ शेतकऱ्यांना १५६ कोटी ६४ लाख रुपये (१०९.६७ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. जिल्हा अग्रणी बॅंकेच्या अहवालात जिल्हा बॅंकेने केवळ पीककर्जाचे नूतनीकरण केले असल्याचे दर्शविले आहे. नवीन कर्ज दिलेल्या शेतकऱ्यांची संख्या नमूद केलेली नाही. 

पीककर्ज वाटपात साडेतीनशे कोटींची घट  यंदा एकूण वाटपापैकी नवीन ३२ हजार १४६ शेतकऱ्यांना २९९ कोटी ७९ लाख रुपयाचे पीककर्ज वाटप केले आहे. सर्व बॅंकांच्या मिळून एकूण ७४ हजार ४५३ शेतकऱ्यांनी ४४१ कोटी १३८ रुपयाच्या पीककर्जाचे नूतनीकरण करून घेतले. गतवर्षी (२०२०-२१) एकूण १ लाख ५७ हजार ५० शेतकऱ्यांना १ हजार ९२ कोटी ४० लाख रुपये (६६ टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले होते. त्या तुलनेत यंदा लाभार्थी शेतकरी संख्येत ५० हजार ४५१ची तर कर्ज रकमेत ३५१ कोटी २३ लाख रुपयांनी घट झाली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com