Agriculture news in marathi Three and a half lakh farmers in Nanded district participated in crop registration | Page 2 ||| Agrowon

नांदेड जिल्ह्यात साडेतीन लाख शेतकरी पीकपेरा नोंदणीत सहभागी

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 नोव्हेंबर 2021

नांदेड : ई-पीक पाहणी प्रकल्पातंर्गत पीक पेरा नोंदणीच्या कालावधीत नांदेड जिल्ह्यात तीन लाख ६७ हजार ९३३ खातेदारांनी पिकांचा पेरा नोंदविला आहे. मराठवाड्यात सर्वाधिक नांदेडमध्ये पेरा नोंदल्याची माहिती महसुलच्या सूत्रांनी दिली. तर दुसऱ्या क्रमांकावर लातूर जिल्ह्याचा समावेश आहे. 

नांदेड : ई-पीक पाहणी प्रकल्पातंर्गत पीक पेरा नोंदणीच्या कालावधीत नांदेड जिल्ह्यात तीन लाख ६७ हजार ९३३ खातेदारांनी पिकांचा पेरा नोंदविला आहे. मराठवाड्यात सर्वाधिक नांदेडमध्ये पेरा नोंदल्याची माहिती महसुलच्या सूत्रांनी दिली. तर दुसऱ्या क्रमांकावर लातूर जिल्ह्याचा समावेश आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या महसूल प्रशासनाकडून शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी प्रकल्पातंर्गत पीक पेरा नोंदणीसाठी ३० सप्टेंबरची मुदत होती. हा प्रकल्प महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात आला. ‘माझी शेती, माझा सातबारा, माझा पीक पेरा’ याद्वारे पीक पाहणीची सुरवात १५ ऑगस्टला झाली होती. सध्या तलाठी स्तरावरील पीक पाहणी नोंदविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

जिल्हाधिकारी डॉ. विपिन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी पेरा नोंदणीबाबत आवाहन केले आहे. याला प्रतिसाद मिळाला. 

  नांदेडमध्ये हिमायतगरची आघाडी 

नांदेडमधील सोळा तालुक्यातील सर्वच एक हजार ५५६ गावात ई-पीक पाहणी प्रकल्पातंर्गत पीक पेरा नोंदणीचा कार्यक्रम राबविला. जिल्ह्यात चार लाख ५९ हजार २४ गटात आठ लाख ३८ हजार ३६५ खातेदारांची संख्या आहे. यापैकी ४३.८९ टक्क्यांनुसार तीन लाख ६७ हजार ९३३ खातेदारांनी पीक पेरा नोंदला आहे. यात हिमायतनगर तालुक्यातील ६४.६८ टक्के खातेदारांनी पीक पेरा नोंदला आहे. तर सर्वात कमी धर्माबाद तालुक्यात २९.३८ टक्केच खातेदारांनी यात भाग घेतला.


इतर बातम्या
प्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट...पुणे ः प्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट...
सोलापुरात कांद्याची दहा हजार टन आवकसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कांदा बीजोत्पादन संकटातखामखेडा, जि. नाशिक : चालू वर्षीच्या सततच्या...
सरकारने कापसाला दहा हजार रुपये हमीभाव...नागपूर : भारतीय बाजारपेठेत कापसाचे दर १० हजार...
केसर आंबा निर्यातीस मोठी संधी ः डॉ....औरंगाबाद : ‘‘या वर्षी देशांतून आंबा निर्यात खुली...
वाशीम जिल्ह्यात सिंचन व्यवस्था निर्माण...वाशीम ः जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या विकासासाठी,...
‘जालना पाटबंधारे’कडून भूसंपादनाची...औरंगाबाद : भूसंपादनाची कार्यवाही जालना पाटबंधारे...
कृषी योजनांत नगर राज्यात आघाडीवरनगर ः ‘‘कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ...
आंबेगावच्या ४०० श्रमिकांची ‘ई-श्रम...पुणे : केंद्र सरकारच्या, श्रम व रोजगार...
कनेरगावात ६५ एकरांवर मॉडर्न मार्केट...हिंगोली ः ‘‘जिल्ह्यातील वसमत येथील राष्ट्रीय...
वीजबिल थकबाकीवरून महाविकास आघाडीत कुरबूरमुंबई :  राज्यातील विविध पाणीपुरवठा संस्था...
औरंगाबाद जिल्ह्याची विकासकामांत घोडदौड...औरंगाबाद : ‘‘औरंगाबाद जिल्ह्याची विविध...
पुणे जिल्ह्यातील पशुधनाला मिळणार...पुणे ः ‘‘जिल्ह्याच्या ग्रामिण आणि दुर्गम भागातील...
सातारा जिल्हा बँकेचे कामकाज नेत्रदीपक...सातारा : ‘‘शेतीपूरक व्यवसायात व कर्जपुरवठ्यात...
परभणी जिल्ह्यात ‘रोहयो’ची १ हजार ७२०...परभणी ः जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
कृषी पंपाची वीज तोडणी न थांबविल्यास...यवतमाळ : ‘‘रब्बी पिकांना पाण्याची गरज असताना वीज...
धान खरेदीला मुदतवाढ द्या, अन्यथा आंदोलनगडचिरोली : शासकीय आधारभूत केंद्रांवर धान विक्रीची...
टास्क फोर्समुळे योजना शेतकऱ्यांपर्यंत...नाशिक: संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने...
खानदेशात पीक कर्ज वितरण अत्यल्प ...जळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पीक कर्ज वितरण...
जळगावमधील बारा बाजार समित्यांच्या...जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सुमारे बारा कृषी...