रत्नागिरीत साडेतीन हजार  शेतकऱ्यांनी काढला पीकविमा 

सलग दुसऱ्या वर्षीही भात शेतीच्या नुकसानीपोटी विमा परतावा मिळाल्यामुळे यंदा रत्नागिरी जिल्ह्यातील तिप्पट शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे.
रत्नागिरीत साडेतीन हजार  शेतकऱ्यांनी काढला पीकविमा  Three and a half thousand in Ratnagiri Farmers took out crop insurance
रत्नागिरीत साडेतीन हजार  शेतकऱ्यांनी काढला पीकविमा  Three and a half thousand in Ratnagiri Farmers took out crop insurance

रत्नागिरी : सलग दुसऱ्या वर्षीही भात शेतीच्या नुकसानीपोटी विमा परतावा मिळाल्यामुळे यंदा रत्नागिरी जिल्ह्यातील तिप्पट शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. मुदत वाढ मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांची भर पडली आहे. गतवर्षी तेराशे शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. यंदा ३ हजार ६५१ शेतकऱ्यांनी १८०० हेक्टरवरील विमा उतरवला आहे.  नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळावा, यासाठी पंतप्रधान पीकविमा योजना सुरू करण्यात आली आहे. भात व नागली पिकासाठी विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अत्यल्प होती. मागील दोन वर्षांपूर्वी कापणी केलेले भात पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई दिली गेली. तीनशे शेतकऱ्यांना सुमारे तेरा लाख रुपये भरपाई मिळाली होती. जिल्ह्याचे उंबरठा उत्पन्न ७० टक्केपेक्षा अधिक आहे. ५० टक्केपेक्षा उत्पन्न कमी असल्याचा निकष विमा योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येत असल्याने उंबरठा उत्पन्नामुळे जिल्ह्यातील शेतकरी वंचित राहत होते; मात्र गेल्या दोन वर्षांत पूर, चक्रीवादळ यामुळे पिकांचे होत असलेले नुकसान यामुळे शेतकरी जागृत झाले असून, विमा योजनेकडे कल वाढू लागला आहे. सुरुवातीला १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. शेतकरी वंचित राहू नयेत, यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याने लाभार्थींची संख्या दुपटीने वाढली आहे. ७५४.८१ हेक्टर विमा संरक्षित क्षेत्र जाहीर केले आहे. गतवर्षी १३०० शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले होते; मात्र २५० शेतकऱ्यांना १४ लाखांचा परतावा प्राप्त झाला होता. १५ जुलैपर्यंत १७६८ शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले होते; मात्र मुदतवाढीमुळे संख्या वाढली आहे. भातासाठी ३५११, नागलीसाठी १४० शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामध्ये ४२२ कर्जदार व ३२२९ बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये ३ कोटी ८४ लाख ३४ हजार ७०३ रुपये रक्कम विमा संरक्षित आहे. 

प्रतिक्रिया मुसळधार पावसामुळे नदीकिनारी भागातील भातशेतीचे मोठे नुकसान होते. विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभही चांगल्या प्रकारे मिळतो. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. भविष्यात त्यात आणखी होईल.  -विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी 

तालुकानिहाय विमा काढलेले शेतकरी 

  • तालुका शेतकरी 
  • रत्नागिरी ९५४ 
  • लांजा २०० 
  • चिपळूण २६३ 
  • राजापूर ३३५ 
  • गुहागर २०६ 
  • संगमेश्‍वर ४७५ 
  • खेड २७९ 
  • दापोली २४१ 
  • मंडणगड ६९८ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com