Agriculture news in Marathi Three per cent sowing in Aurangabad, Jalna, Beed districts | Agrowon

औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत तीन टक्के पेरणी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 जून 2021

यंदाच्या खरीप हंगामात १५ जून अखेरपर्यंत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत खरिपाच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ३ टक्के पेरणी उरकली आहे.

औरंगाबाद : यंदाच्या खरीप हंगामात १५ जून अखेरपर्यंत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत खरिपाच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ३ टक्के पेरणी उरकली आहे. अनेक ठिकाणी जमिनीत पुरेशी ओल नसल्याने पेरणीत प्रमुख अडथळा मानला जात आहे.

यंदाच्या खरीप हंगामासाठी औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र १९ लाख ९९ हजार ५३६ हेक्टर आहे. या क्षेत्राच्या तुलनेत १५ जून अखेरपर्यंत ५७ हजार ४९० हेक्टरवर खरिपाची पेरणी उरकली आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी औरंगाबाद जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख २० हजार ९२१ हेक्‍टर इतके आहे. त्या तुलनेत जिल्ह्यात केवळ १३२४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जालना जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख ७० हजार ६३३ खरीप पीक इतके आहे. त्या तुलनेत जिल्ह्यात ६ टक्के अर्थात ३४ हजार ८९३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी उरकली आहे. 

बीड जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ७ हजार ९८२ हेक्टर आहे. त्या तुलनेत जिल्ह्यात २१ हजार २७३ हेक्‍टर अर्थात, ३ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी उरकली आहे. अनेक ठिकाणी असमान पाऊस पडला आहे. त्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत.

२० हजार ५१२ हेक्टरवर कपाशी
औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत यंदाच्या खरीप हंगामासाठी कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र १० लाख ६७ हजार ५३५ हेक्टर इतके आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक ४ लाख ३७ हजार ८१६ हेक्टर, जालना जिल्ह्यातील २ लाख ८६ हजार ४५३ हेक्टर तर बीड जिल्ह्यातील ३ लाख ४३ हजार २६६ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. त्या तुलनेत २२५१२ हेक्‍टरवर कपाशीची लागवड उरकली आहे.

सोयाबीनची ८५५४ हेक्‍टरवर पेरणी
तिन्ही जिल्ह्यांत सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख १३ हजार ४७६ हेक्टर आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १७ हजार ६३१ हेक्टर, जालना जिल्ह्यातील ९५ हजार ८४५ हेक्टर तर बीड जिल्ह्यातील १ लाख हेक्टर सोयाबीन क्षेत्राचा समावेश आहे. या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत तिन्ही जिल्ह्यांत ८५५४ हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रात औरंगाबाद जिल्ह्यातील ३ हेक्टर, जालना जिल्ह्यातील ३३२८ हेक्टर, तर बीड जिल्ह्यातील ५ हजार २२३ हेक्टर क्षेत्राचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
 


इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय शेतीचे तंत्र अंगीकारा ः डॉ. ढवणबदनापूर, जि. जालना : अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित...
पंतप्रधान आवास योजनेसाठी ११ लाख नावे...नगर ः ग्रामीण भागातील गरीब, अल्पभूधारक, घर...
अमरावती : निकृष्ट बियाणेप्रकरणी भरपाईचे...अमरावती ः निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय...
सात-बारासह फेरफारही मिळणार आता ऑनलाइन...पुणे : शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत...
सांगली : पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा...सांगली : महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू...
अतिवृष्टीने नुकसान; ३४ हजारांवर अर्जअकोला : गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस...
जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर...आळेफाटा, जि. पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड...
नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी...नगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या...
पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय...अकोला : दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन...
राळेगावमध्ये कपाशीवर बोंडअळीचा...राळेगाव, जि. यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्य पीक...
परभणीत ४४६ कोटी ५९ लाख रुपये वितरणपरभणी ः चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै...
अनेक नोंदणीधारक शेतकरी ज्वारी...भालेर, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३०...
डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक नागपूर : डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या...
महसूली प्रकरणांचा निपटारा तीन टप्प्यांत...नाशिक : सेवाहक्कांतर्गत १००पेक्षा अधिक व राज्यात...
उजनीतून खरिपासाठी पहिले आवर्तन सोडणारसोलापूर ः उजनी धरणात आतापर्यंत उपयुक्त पाणीसाठा...
नागपुरात सोयाबीन दरातील घोडदौड कायम नागपूर ः प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढल्याने...
कृषी सल्ला : दापोली विभागपावसाच्या पाण्यामुळे फवारणी केलेले कीटकनाशक किंवा...
नगरला वाटाणा, भेंडीच्या दरात सुधारणा;...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नाशिकमध्ये डाळिंबाच्या आवकेत वाढनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पावसाच्या उघडिपीमुळे भाजीपाला आवकेत वाढपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...