Agriculture news in marathi Three days' full curfew in Solapur | Agrowon

सोलापुरात तीन दिवस संपूर्णपणे संचारबंदी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 एप्रिल 2020

सोलापूर : सोलापूर शहरात १५ वर असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सोमवारी (ता.२०) आणखी सहा रुग्णांची भर पडली. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या २१ वर पोहचली आहे. त्यामुळे सोलापूरकरांची चिंता वाढली आहे.

सोलापूर : सोलापूर शहरात १५ वर असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सोमवारी (ता.२०) आणखी सहा रुग्णांची भर पडली. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या २१ वर पोहचली आहे. त्यामुळे सोलापूरकरांची चिंता वाढली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी दुपारपासून ते गुरुवार (ता.२३) रात्री १२ पर्यंत शहरात संपूर्णपणे संचारबंदी लागू केली आहे. अचानकपणे उदभवलेल्या या परिस्थितीमुळे ग्रीनझोनमध्ये असलेले सोलापूर आता ‘रेडझोन’मध्ये गेल्याचे चित्र आहे. 

सोलापुरात १२ एप्रिलपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता, पण त्याचदिवशी किराणा दुकानदाराच्या मृत्यूने एका रुग्णाचा प्रवेश झाला. त्यानंतर टप्प्या टप्प्याने रुग्णसंख्या वाढत गेली. त्यानंतर रविवारीच सत्तरफूट परिसरातील एक महिला कोरोनाबाधित आढळली. तिचाही मृत्यू झाला आणि त्यानंतर सोमवारी ही संख्या एकाचदिवशी सहाने वाढली. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक झाल्याने जिल्हाधिकारी शंभरकर यांनी शहरात संपूर्णपणे संचारबंदीचे आदेश दिले आहेत. 

या संचारबंदीत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असतील. वैद्यकीय सेवा, खासगी व सरकारी रुग्णालये, डॉक्टर, वैद्यकीय सेवेशी संबंधित वाहने, कर्मचारी, मेडिकल दुकाने यांना या संचारबंदीतून वगळण्यात आले आहे. त्यांच्याशिवाय पाणीपुरवठा, अग्निशामक दल, वीजपुरवठा या बाबीदेखील अत्यावश्यक सेवा करण्यात आल्या. सकाळी सहा ते नऊच्या आतच दूध वाटप करता येईल. पेट्रोलपंप सकाळी ७ ते ११ पर्यंतच सुरू राहतील. तेही अत्यावश्यक सेवेतील वाहनांना इंधन पुरवतील. 

भारतरत्न इंदिरानगरची भर 

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार कारवाई होईल. शहरात यापूर्वीच पाच्छा पेठ आणि रविवार पेठेतील जोशी गल्ली हे दोन बफर झोन जाहीर केलेले आहेत. त्यात भारतरत्न इंदिरानगरची आता भर पडली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ग्रीनझोनमध्ये असलेले सोलापूर आता रेडझोनमध्ये आले आहे. 

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...