निर्यातक्षम द्राक्ष बागांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी तीन दिवस बाकी

Three days left for online registration of exportable graps farms
Three days left for online registration of exportable graps farms

पुणे : निर्यातीसाठी निर्यातक्षम द्राक्ष बागांच्या नोंदणीकरिता ग्रेपनेट या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आता अखेरचे तीन दिवस बाकी आहेत. ज्या शेतकऱ्यांना आपल्या निर्यातक्षम द्राक्ष बागांचे नूतनीकरण आणि यंदाच्या वर्षीची नव्याने नोंदणी करायची आहे त्यांनी ३० नोव्हेंबरपूर्वी संबधित तालुक्याच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज करावेत, असे आवाहन फलोत्पादन विभागातील अधिकाऱ्यांनी केले आहे.

मागील वर्षापासून ऑनलाइन द्राक्ष बागांची नोंदणी करण्याकरिता अपेडा फार्मरकनेक्ट मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. चालू वर्षी १४ ऑक्टोबरपासून ‘ग्रेपनेट’ ही ऑनलाइन कार्यप्रणाली राज्यातील ३४ जिल्ह्यांसाठी कार्यान्वित केलेली आहे. युरोपियन युनियन तसेच रशिया, चीन, हॉगकाँग, मलेशिया, दुबई व इतर देशांना द्राक्ष निर्यातीकरिता ग्रेपनेटद्वारे बागांची नोंदणी आवश्यक आहे.

निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्याकरिता शेतकऱ्यांनी प्रपत्र एक मध्ये अर्ज व अर्जासोबत सात बारा उताऱ्याची प्रत व बागेचा नकाशा तसेच ५० रुपये फी भरून अर्ज संबधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा. निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी केल्यानंतर त्याबाबतचा संदेश संबधित शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पाठवण्यात येणार आहे.

चालू वर्षीपासून निर्यातक्षम नोंदणीकृत बागेतील कीड रोगांचे नियंत्रण करण्याकरिता लेबलक्लेम कीडनाशकांची यादी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी यांच्यामार्फत अंतिम करून प्रपत्र पाचमध्ये अपेडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच कीडनाशक उर्वरित अंशाची हमी देण्याकरिता तपासवयाची कीडनाशकाची यादी अंतिम केली असून ती पपत्र नऊमध्ये तयार केली आहे. ही माहितीही अपेडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नोंदणीकृत द्राक्ष बागायतदारांनी कीड व रोग नियंत्रणाकरिता लेबलक्लेम कीडनाशकांचा वापर करावा. तसेच वापरण्यात आलेल्या कीडनाशकांचा तपशील प्रपत्र दोनमध्ये अद्ययावत ठेऊन संबधित कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक या तपासणी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेणे आवश्यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com