Three days of unseasonal rains in the state
Three days of unseasonal rains in the state

राज्यात तीन दिवस पूर्वमोसमी पावसाची शक्यता 

राज्यातील अनेक भागात वातावरणात वेगाने बदल होत आहे. दिवसभर ऊन तर दुपारनंतर अवकाळी पाऊस पडत आहे. येत्या शुक्रवारपर्यंत (ता. १६) राज्यातील काही भागात पूर्वमोसमी पाऊस पडणार आहे.

पुणे : राज्यातील अनेक भागात वातावरणात वेगाने बदल होत आहे. दिवसभर ऊन तर दुपारनंतर पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. येत्या शुक्रवारपर्यंत (ता. १६) राज्यातील काही भागात  पूर्वमोसमी पाऊस पडणार आहे. विदर्भात उद्या (बुधवारी) चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात गारपिट होण्याची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

गेल्या दोन दिवसांपासून उत्तर केरळ ते मध्य प्रदेशाच्या नैऋत्य भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. ही स्थिती कर्नाटक, मराठवाडा या दरम्यान आहे. तर, मध्य प्रदेशाच्या नैऋत्य भागात स्थिती सक्रिय आहे. ही स्थिती समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. तर दक्षिण तमिळनाडू ते दक्षिण कोकण, केरळ आणि कर्नाटक परिसरात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्रिय स्थितीमध्ये रूपांतर झाले आहे. याशिवाय कोमोरीन परिसर व दक्षिण तमिळनाडू व परिसरातही चक्रिय स्थिती आहे. बंगालचा उपसागर, श्रीलंका, दक्षिण तमिळनाडूची किनारपट्टी या भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. 

ढगाळ वातावरणामुळे झळा काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. त्यामुळे कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत बऱ्यापैकी घट झाली आहे. विदर्भात वाढलेला पाराही किंचित कमी झाला आहे. सोमवारी (ता. १२) सकाळी चोवीस तासांत खानदेशातील जळगाव येथे सर्वाधिक ४१.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. काही भागात झालेल्या पावसामुळे गारवा तयार झाल्याने किमान तापमानात किंचित घट झाली आहे. महाबळेश्वर येथे १७.५ सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले.    येथे  पूर्वमोसमीची शक्यता :  मंगळवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ  बुधवार ः रत्नागिरी, सिंधुदूर्ग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ  गुरूवार ः परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com