मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत २ लाख हेक्‍टरवर ज्वारी

Three districts of Marathwada sow over 2 lakh hectares Jwar
Three districts of Marathwada sow over 2 lakh hectares Jwar

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतील पेरणी झालेल्या ३ लाख ५२ हजार ४१६ हेक्‍टरपैकी २ लाख ५ हजार ३४४ हेक्‍टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे. नोव्हेंबर अखेरीसच्या कृषी विभागाच्या पेरणी अहवालानुसार, सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत जवळपास ४४ टक्‍के पेरणी आटोपली आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. 

या तीन जिल्ह्यांत यंदा रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ८ लाख ५ हजार २६८ हेक्‍टर आहे. त्यापैकी ४४ टक्‍के क्षेत्रावर ही पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीसह, गहू, मका, हरभरा, करडई, मोहरी, कारळ, जवस, सूर्यफूल आदी पिकांचा समावेश आहे. एकूण क्षेत्रामध्ये २ लाख ५ हजार ३४४ हेक्‍टरवर ज्वारी आहे. या ज्वारीच्या क्षेत्रात औरंगाबाद जिल्ह्यातील २० हजार २४४ हेक्‍टर, जालना ५४ हजार ४९६ हेक्‍टर, तर बीड जिल्ह्यातील सर्वाधिक १ लाख ३० हजार ६०४ हेक्‍टरचा समावेश आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्‍यात ४१९७ हेक्‍टरवर ज्वारीची पेरणी झाली. त्यापाठोपाठ पैठण ५३४० हेक्‍टर, फुलंब्री १३१ हेक्‍टर, वैजापूर २४३० हेक्‍टर, गंगापूर ६१३५ हेक्‍टर, खुल्ताबाद १२०३ हेक्‍टर, सिल्लोड १२४ हेक्‍टर, कन्नड ५७४ हेक्‍टर, सोयगाव ११० हेक्‍टरवर ज्वारी आहे. 

जालना जिल्ह्यातील जालना तालुक्‍यात १२६६० हेक्‍टर, भोकरदन २४७८ हेक्‍टर, जाफ्राबाद ४४४२ हेक्‍टर, बदनापूर ४९३५ हेक्‍टर, परतूर ४३७८ हेक्‍टर, अंबड १०५२१ हेक्‍टर, घनसावंगी ३७३७ हेक्‍टर, मंठा ११३४५ हेक्‍टरवर ज्वारी आहे. बीड जिल्ह्यात बीड तालुक्‍यात १२४५१ हेक्‍टर, पाटोदा १६०८० हेक्‍टर, आष्टी ४६६९७ हेक्‍टर, शिरूर २०२१५ हेक्‍टर, माजलगाव ४९७७ हेक्‍टर, गेवराई १२६७३ हेक्‍टर, धारूर २२१७ हेक्‍टर, वडवणी २०१९ हेक्‍टर, अंबाजोगाई ४७४९ हेक्‍टर, केज ६३७२ हेक्‍टर, तर परळी तालुक्‍यात २१६२ हेक्‍टरवर ज्वारीची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

रब्बी ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

पोक्रांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील शरणापूर गावशिवारातील शेती शाळेस विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी नुकतीच भेट दिली. यादरम्यान रब्बी ज्वारी पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना करावयाच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या. या आधीही गंगापूर तालुक्‍यात पावसामुळे ज्वारी मोडण्याची वेळ आली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com