agriculture news in Marathi, three hundred twenty five crore distribute to crop insurance companies, mumbai, maharashtra | Agrowon

पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरित

टीम अॅग्रोवन
रविवार, 21 जुलै 2019

मुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोचत नसल्याच्या तक्रारी राज्यभरातून येत आहेत. विरोधकांनी आरोप केल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेने थेट मुंबईतील एका विमा कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेला. या मोर्चाने शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला नसला तरी कंपन्यांचा सुटल्याचे चित्र आहे. या आंदोलनानंतर लगेचच राज्य सरकारने पीक आणि फळ पीकविम्याची आपल्या हिश्याची सुमारे ३२५ कोटी रुपयांची रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे.

मुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोचत नसल्याच्या तक्रारी राज्यभरातून येत आहेत. विरोधकांनी आरोप केल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेने थेट मुंबईतील एका विमा कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेला. या मोर्चाने शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला नसला तरी कंपन्यांचा सुटल्याचे चित्र आहे. या आंदोलनानंतर लगेचच राज्य सरकारने पीक आणि फळ पीकविम्याची आपल्या हिश्याची सुमारे ३२५ कोटी रुपयांची रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे.

राज्यात रब्बी १९९९ हंगामापासून राष्ट्रीय कृषी विमा योजना चालू होती. या योजनेतील त्रुटी दूर करून खरीप २०१६ हंगामापासून राज्यात पंतप्रधान पीकविमा योजना लागू झाली आहे. गेल्या काही वर्षांतील हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पीकविमा योजना ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरली आहे. नैसर्गिक असमतोलामुळे पिकांचे कधीही नुकसान होऊ शकते. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दृष्टिकोनातून पीक विमा योजना महत्त्वपूर्ण ठरली. 

राज्यात गेल्यावर्षी जून ते सप्टेंबर या मॉन्सूनच्या काळात पाऊस कमी झाला. त्यातच परतीच्या पावसानेही आवश्‍यक तेवढी हजेरी लावली नाही. राज्यातील दुष्काळी स्थिती आणि रब्बी पेरणीसाठी जमिनीत आवश्‍यक ओलावा नसल्याने १८-१९ च्या रब्बी हंगामात राज्यातील पेरणी क्षेत्रात मोठी घट झाली. 

राज्यातील रब्बीच्या लागवडीखालील सरासरी क्षेत्र ५६ लाख ९३ हजार १५९ हेक्टर इतके आहे. दुष्काळामुळे संपलेल्या रब्बी हंगामात त्यापैकी ३३ लाख ८१ हजार ९२९ हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झालेली होती. दुष्काळात अथवा नैसर्गिक संकट काळात शेतकऱ्यांचा पीकविम्याकडे ओढा वाढत असल्याचे दिसून येत आहे.

पंतप्रधान २०१८-१९ मधील रब्बी हंगामातील पीकविम्याचा राज्य सरकारचा संपूर्ण हिस्सा ३७७ कोटी ७९ लाख आणि हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी २२७ कोटी ९ लाख रुपयांचा संपूर्ण हिस्सा इतका होतो. शासन निर्णयानुसार या दोन्ही योजनांचा उर्वरित सुमारे ३२५ कोटी रुपयांचा शेवटचा हफ्ता नुकताच वितरित करण्यात आला आहे. रब्बी हंगाम २०१८-१९ साठी फ्युचर जनरल इन्शुरन्स, बजाज अलायन्झ आणि भारती अ‍ॅक्सा या तीन कंपन्यांमार्फत पीकविमा योजना राबविण्यात येत आहे.


इतर बातम्या
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
शेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम...अकोला ः अधिक उत्पादनासाठी शेतकरी गटांनी...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
पुणे जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींना ‘...पुणे : जलजन्य साथरोग, आजारांचा धोका उद्भवू नये,...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
निर्यातबंदीमुळे कांदा फुगवटा;...पुणे: कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...