agriculture news in marathi three hundred twenty three hectare crop damage in Satara District | Page 3 ||| Agrowon

साताऱ्यात ३२३ हेक्‍टरवर पिकांचे मोठे नुकसान

ॲग्रोवन वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

सातारा : नुकत्याच झालेल्या पूर्वमोसमी वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे कोरेगाव, खटाव, पाटण व माण तालुक्‍यातील ३२३.३६ हेक्‍टर क्षेत्रावरील बागायती व फळपिकांचे नुकसान झाले आहे.

सातारा : नुकत्याच झालेल्या पूर्वमोसमी वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे कोरेगाव, खटाव, पाटण व माण तालुक्‍यातील ३२३.३६ हेक्‍टर क्षेत्रावरील बागायती व फळपिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये एक हजार २९ शेतकरी बाधित झाले आहेत. सर्वाधिक नुकसान खटाव तालुक्‍यात झाले आहे. सध्या पंचनामे कृषी व महसूल विभागाकडून सुरू असून या नुकसानीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

चार दिवसांत झालेल्या पूर्वमोसमी पाऊस व गारपिटीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला आहे. याचा सर्वाधिक फटका कोरेगाव, खटाव, माण व पाटण तालुक्‍यातील शेतकऱ्यांना बसला आहे.  वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात झालेल्या गारपिटीमुळे कोरेगाव तालुक्‍यात काही ठिकाणी रस्त्यांवर व शेतात गारांचा खच पडला होता. त्यामुळे गारपिटीमुळे फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा, कलिंगड, चिकू या फळांची गळ होऊन हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा हिरावला आहे. तसेच कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये आर्थिक आधार ठरलेल्या बागायती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. 

कोरेगाव तालुक्‍यातील ८७ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले असून, २९१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. खटाव तालुक्‍यातील २३७ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान होऊन ७२९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पाटण तालुक्‍यातील एका शेतकऱ्याचे ०.२६ हेक्‍टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. तर माण तालुक्‍यातील २.१० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान होऊन आठ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अद्याप कृषी विभाग व महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू असून या नुकसानीत आणखी भर पडणार आहे. आता या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने आपत्कालीन परिस्थितीत भरपाई मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

या पिकांना फटका...
टोमॅटो, वांगी, कांदा, भाजीपाला, मका, झेंडू, पपई, घेवडा, हरभरा, बाजरी, मिरची, भोपळा, आंबा, चिकू, कलिंगड, डाळिंब आदी. 


इतर ताज्या घडामोडी
पावसाअभावी विदर्भात तीन टक्के...नागपूर : पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे विदर्भात...
आरक्षणाबाबत लोकप्रतिनिधींनी आपली...कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आजपासून (ता. १६)...
‘मिहान’मध्ये गुंतवणूक वाढविण्याची ...नागपूर : विदर्भाचे भविष्य बदलविणारा मिहान प्रकल्प...
मेळघाटातील गावाला होणार सौरऊर्जेचा...अमरावती : धारणी तालुक्यातील चोपण या दुर्गम गावात...
सोलापुरात खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी...सोलापूर : जिह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक...
मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला...सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या...
केंद्राने साखर निर्यातीसाठी अनुदान...शिराळा, जि. सांगली : केंद्र शासनाने साखर निर्यात...
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंतपुणे : पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
जलसंपदा विभागाची कार्यालये, आस्थापना...सोलापूर ः केवळ कार्यालयाकडे कामे नाहीत, अपुरा...
बाधित शेतकऱ्यांना हक्काचा मोबदला द्यावानाशिक : पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे भूसंपादन व...
पीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः...नाशिक : नाशिक हा शेतीप्रधान जिल्हा असल्याने...
परभणीत पीककर्जाचे केवळ १४.९१ टक्के वितरणपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पीककर्ज...
शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला...मंचर, जि. पुणे : ‘‘पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे...
लिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा...अकोला : जिल्ह्यात बियाणे, खत विक्रीत सुरू...
खानदेशात पावसाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या...
विनावापर भूखंडांबाबत कार्यवाही करावी ः...औरंगाबाद : पैठण ‘एमआयडीसी’तील वितरित झालेल्या...
लाखगंगा गावातून पुन्हा दूध दरासाठी...औरंगाबाद : लॉकडाउनचे कारण देत दूध खरेदीचे दर...
सातव्या वेतन आयोगासाठी महामंडळांमधील...नगर : राज्यातील विविध महामंडळांमधील अधिकारी-...
रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूरला ...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी...
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना...वडाळी जि. अकोला : या हंगामाला सुरुवात होताच...