agriculture news in marathi Three killed in lightning strike in Nanded district | Page 2 ||| Agrowon

नांदेड जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू

टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 मे 2021

नांदेड : जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाने मागील काही दिवसापासून तडाखा दिला आहे. या दरम्यान वीज पडून तिघांना जीव गमवावा लागला, तर चौघे जखमी झाले आहेत.

नांदेड : जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाने मागील काही दिवसापासून तडाखा दिला आहे. या दरम्यान वीज पडून तिघांना जीव गमवावा लागला, तर चौघे जखमी झाले आहेत. तसेच लहान - मोठी १३ जनावरेही दगावली आहेत. उन्हाळी पिके, फळपिक व भाजीपाला नुकसानीबाबत माहिती मागविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पूर्व मोसमी पावसाने तडाखा दिला आहे. यात वादळी वारे, गारपीट तसेच पावसाने झोडपून काढल्याने शेतीपिकासह भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी हळद शिजवून वाळवणीसाठी घातली होती. त्यावर पाणी पडल्याने शेतकऱ्यांची धावपळ झाली. 

दरम्यान, जिल्ह्यात मार्च, एप्रिलनंतर मे महिन्यातही पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी गारपीट झाली. वीज पडल्याच्या घटना समोर आल्या. यात मुखेड तालुक्यातील तुपदाळ खु. येथील रमेश पंढरीनाथ दोमाटे (वय ५५), नंदगाव (ता. किनवट) येथील विश्वनाथ नंदकुमार तरटे (वय २०) यांचा शुक्रवारी (ता. ७), तर मुदखेड तालुक्यातील मुगट येथील लक्ष्मीबाइ बालाजी वर्षेवार (वय २८) या महिलेचा रविवारी (ता. ९) वीज पडून मृत्यू झाला.

जखमींमध्ये मुगट (ता. मुदखेड) येथील रेणुका व्यंकटी वर्षेवार (वय ३), इंदूबाई बाबूराव लोखंडे (वय ५५), अर्चना दिलीप मुंडकर (वय २२) व डोंगरगाव (ता. लोहा) येथील विष्णू उत्तम राठोड यांचा समावेश आहे. मयत तसेच जखमी नागरिकांच्या कुटुंबांतील व्यक्तींना तातडीने मदत देण्यात येणार आहे.

 तेरा जनावरे दगावली

वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाचेही नुकसान झाले आहे. यात वीज पडून जिल्ह्यातील लहान -मोठी १३ जनावरे मृत्यूमुखी पडली. यात गाय एक, सात म्हशी, दोन वासरे, तीन बैलांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षातून मिळाली. पशुपालकांना जिल्हा प्रशासनाकडून मदत देण्यात येणार आहे.


इतर बातम्या
अकोल्यातील २३३६ कर्जदार सावकारी...अकोला : शासनाने जाहीर केलेल्या परवानाधारक सावकारी...
गोंदिया : पावसाअभावी दीड लाख हेक्‍...गोंदिया :  देशात मॉन्सूनचे आगमन होऊन दोन...
नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्यावी...सोलापूर : ‘‘यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण...
उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनमध्ये शंखी...बेलकुंड, जि. उस्मानाबाद जिल्ह्यात : बेलकुंड (ता....
नांदेडमध्ये नुकसानीचे पंचनामे करण्याचे...नांदेड : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच सततच्या...
खानदेशात सोयाबीन पेरणीत घटजळगाव : खानदेशात यंदा नापेर क्षेत्र यंदा वाढणार...
खानदेशात कापसाची आठ लाख हेक्टरवर लागवडजळगाव ः  खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. यंदा...
भीमा-नीरा नदी काठांवरील गावांनी सतर्क...सोलापूर : ‘‘भीमा-नीरा खोऱ्यात होत असलेल्या...
मराठवाड्यात पाऊस कायम; जोर कमीऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. २३)...
नाशिक जिल्ह्यात खासगी पशुसेवकांचे काम...येवला : खासगी पशुसेवक ग्रामीण भागात मोठ्या...
पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह...
सांगलीत चौदा हजार जनावरांचे स्थलांतरसांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील...
कोसळलेला प्रसंग मोठा; तुमचं पुनर्वसन...मुंबई ः तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे....
मुगावर ‘लिफ क्रिंकल’ प्रादुर्भावअकोला : गेल्या हंगामात लिफ क्रिंकल विषाणूजन्य...
परभणी जिल्ह्यात मोठ्या, मध्यम...परभणी ः पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला....
पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची...पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह,...
नऊ जिल्हे अतिवृष्टिबाधित मुंबई ः कोकण आणि पश्‍चिम महाराष्‍ट्रातील ९ जिल्हे...
वाशीम जिल्ह्यात ६९९ कोटींचे पीककर्ज वाटपवाशीम : जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
कोल्हापुरात पुराची भीती कायम कोल्हापूर : पावसाने शनिवारी (ता.२४) दुपारपर्यंत...
नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक २५५...पुणे : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम पट्यात...