महावितरणकडे तीन लाख ग्राहकांनी पाठवले मीटर रीडिंग 

नाशिक : महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील ३ लाख ६३ हजार वीज ग्राहकांनी पोर्टल व मोबाईल अॅपद्वारे गेल्या एप्रिल महिन्याचे स्वतःहून मीटर रीडिंग पाठविले आहे. या सर्व ग्राहकांना त्यांच्या वीज वापरानुसार महावितरणकडून वीजबिल दिलेले आहे. राज्यात पुणे परिमंडलातील सर्वाधिक ६९ हजार ९१२ तर त्यापाठोपाठ कल्याण परिमंडलातील ५८ हजार २१० वीजग्राहकांचा समावेश आहे.
Three lakh customers sent meter readings to MSEDCL
Three lakh customers sent meter readings to MSEDCL

नाशिक : महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील ३ लाख ६३ हजार वीज ग्राहकांनी पोर्टल व मोबाईल अॅपद्वारे गेल्या एप्रिल महिन्याचे स्वतःहून मीटर रीडिंग पाठविले आहे. या सर्व ग्राहकांना त्यांच्या वीज वापरानुसार महावितरणकडून वीजबिल दिलेले आहे. राज्यात पुणे परिमंडलातील सर्वाधिक ६९ हजार ९१२ तर त्यापाठोपाठ कल्याण परिमंडलातील ५८ हजार २१० वीजग्राहकांचा समावेश आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाउनसारख्या प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून महावितरणने गेल्या २३ मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटर रीडिंग घेण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे. यासोबतच वीजबिलांची छपाई करणे व वितरण देखील बंद करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रीडिंग उपलब्ध होणे शक्य नसल्याने वीजग्राहकांनी सरासरीनुसार वीजबिल पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मात्र, महावितरणची www.mahadiscom.in वेबसाईट व ‘महावितरण’ मोबाईल अॅपद्वारे वीजग्राहकांना मीटरच्या रीडिंगचे फोटो पाठवून स्वतः रिडींग घेण्याची सोय उपलब्ध आहे. या रीडिंगप्रमाणे वीजवापराचे अचूक बिल तयार करण्यासाठी जास्तीत जास्त वीजग्राहकांनी मीटरच्या रीडिंगचे फोटो पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. 

त्यासाठी वीजग्राहकांना नोंदणी केलेल्या मोबाईलवर महावितरणकडून‘एसएमएस’ पाठविला जात असून त्यामध्ये मीटर रीडिंग पाठविण्याची मुदत नमूद करण्यात येत आहे. महावितरणच्या या आवाहनाला प्रतिसाद देत गेल्या एप्रिल महिन्याच्या वीजवापराचे तब्बल ३ लाख ६३ हजार १७५ वीजग्राहकांनी पोर्टल व मोबाईल अॅपद्वारे दिलेल्या मुदतीमध्ये मीटर रीडिंग पाठविले आहे. 

महावितरणने वीजग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेचा जास्तीतजास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा. महावितरणकडून प्रत्यक्ष रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरू होईपर्यंत वीजग्राहकांनी मोबाईल अॅप व वेबसाईटमध्ये लॉगीन करून दिलेल्या मुदतीत मीटर रीडिंगचा फोटो अपलोड करून मीटर रिडींग पाठवावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 

राज्यातील परिमंडल निहाय ग्राहकांचा प्रतिसाद :  पुणे-६९९१२, कल्याण-५८२१०, भांडूप-३७५४३, नागपूर-२७७२०, नाशिक- २५८३१, कोल्हापूर-२२७२८, बारामती-२०९४१, जळगाव-१७६६४, औरंगाबाद- १६३७४, अकोला-१३७६७, अमरावती-१३५४०, चंद्रपूर-८८२४, कोकण-८५४२, नांदेड-७३४८, गोंदिया-७२६८, लातूर-६९६३ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com