| Page 4 ||| Agrowon

सोलापूर जिल्ह्यात यंदा हंगामात तीन लाख हेक्टर ऊस उपलब्ध

बुधवार, 20 ऑक्टोबर 2021

सोलापूर ः जिल्ह्यातील गाळप हंगाम सुरू झाला आहे. आतापर्यंत पाच कारखान्याची धुराडी पेटली आहेत. त्यातच यंदा सुमारे दोन लाख ९० हजार ५५८ हेक्टरपर्यंत उसाची मुबलक उपलब्धता आहे. त्यादृष्टीने कारखान्यांनी तयारी सुरू केली आहे. किमान सहा महिन्यांपर्यंत हंगाम चालेल, असा अंदाज आहे.

सोलापूर ः जिल्ह्यातील गाळप हंगाम सुरू झाला आहे. आतापर्यंत पाच कारखान्याची धुराडी पेटली आहेत. त्यातच यंदा सुमारे दोन लाख ९० हजार ५५८ हेक्टरपर्यंत उसाची मुबलक उपलब्धता आहे. त्यादृष्टीने कारखान्यांनी तयारी सुरू केली आहे. किमान सहा महिन्यांपर्यंत हंगाम चालेल, असा अंदाज आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी आणि यंदाही पुरेसा पाऊस झाला. त्यामुळे ऊसक्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. प्रामुख्याने पंढरपूर, मोहोळ, माळशिरस, करमाळा आणि माढा तालुक्यात उसाचे सर्वाधिक क्षेत्र आहे. जिल्ह्यात सुमारे ३५ साखर कारखाने आहेत. त्या त्या कारखान्यांनी आपापल्या उसाची नोंदी पूर्ण केली आहेत.

यंदा जिल्ह्यात नोंद झालेल्या २ लाख ९० हजार ५५८ हेक्टर उसापैकी ८१ हजार ५८५ हेक्टर आडसाली उसाचा समावेश आहे. तर पूर्व हंगामातील लागवडीचा ६१ हजार ३७५ हेक्टर, सुरू हंगामातील ३३ हजार ४६४ हेक्टर आणि खोडव्यातील १ लाख १४ हजार १३२ हेक्टर उसाचा समावेश आहे. त्यात सर्वाधिक विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडे २२ हजार २०० हेक्टरची नोंद झाली आहे. 

एफआरपीबाबत मौन

यंदा पुरेशा प्रमाणात उसाची उपलब्धता असली आणि कारखान्यांनी आपला गाळप हंगाम सुरू करण्यास सुरुवात केली असली, तरी कारखान्यांनी यंदाच्या हंगामातील एफआरपीबाबत मात्र सोईस्कर मौन बाळगले आहे. त्याबाबत कोणीच कोणतीच घोषणा केलेली नाही. त्यामुळे एफआरपीचे काय, हा प्रश्न तसाच आहे.

टॅग्स

इतर बातम्या
  वखारच्या ऑनलाइन शेतीमाल तारण कर्जात...पुणे : राज्य वखार महामंडळाच्या ऑनलाइन (ब्लॉकचेन)...
हिंगोलीत सोयाबीन दरात सुधारणाहिंगोली ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात ज्वारी, गहू,...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या (२०२१-...
डाळिंबाच्या सुकर वाटेसाठी गडकरी...जालना : संपूर्ण राज्यात महत्वाचे फळपीक असलेल्या...
अमरावती जिल्ह्याती ‘पीएम किसान’ची ५...अमरावती ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभ...
कृष्णाकाठावर मजुरांअभावी ऊस रोपांची लागणभिलवडी, जि. सांगली ः कृष्णाकाठावर उसाच्या कांडी...
कोल्हापूर, सांगलीत ‘कृषिपंप...कोल्हापूर  : गेल्या तीन दिवसांत कोल्हापूर व...
वीज पुरवठा सुरळीत  करण्यासाठी इंदापुरात...पुणे ः जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील थकबाकीदार...
खानदेशात पीककर्ज वितरणाला येईना गतीजळगाव ः  खानदेशात रब्बी हंगामासाठी पीक...
सोयाबीन दराची घोडदौड सुरूच राहणार पुणे ः तेलबिया आणि खाद्यतेलाच्या दारातील...
पुणे बाजार समितीचा वारणारांना चाप ः गरडपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे,...
जळगाव जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेकजळगाव ः जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने...
पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात...पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान...
वीजप्रश्नी संतप्त शेतकरी  महावितरण...नाशिक : महावितरण कंपनीकडून सटाणा तालुक्यात थकीत...
कापूस खेडा खरेदी करणाऱ्या ...बुलडाणा ः खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना...
कडुलिंबाची झाडे वाळू लागली पुणे नगर ः नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील...
राज्यातील १२१ आदिवासी  आश्रमशाळा होणार...पुणे ः शिक्षण व्यवस्थेमधील बदलांना सामोरे जात...
लाल कांद्याला उन्हाळच्या  तुलनेत मिळतोय...नाशिक : दिवाळीनंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी...पुणे नगर ः राज्यातील मुदत संपलेल्या परंतु,...