नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय समिती

नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय समिती
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय समिती

नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता. १२) जलसंपदा, जलसंधारण आणि जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागांनी नोडल अधिकारी नियुक्त करावे. जिल्हा प्रशासनाने तीन सदस्यीय समिती नेमून जिल्ह्यातील सर्व धरणांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिले. 

राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी राज्यभरातील जिल्हा प्रशासनांना धरणांची सुरक्षितता व डागडुजीसाठी तत्काळ पावले उचलण्याचे आदेश दिले होते. या कामांमध्ये यंत्रणांनी निधी व हद्दीचा मुद्दा बाजूला ठेवावा. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांमध्ये समन्वय साधावा, असा सल्ला मेहता यांनी दिला होता. 

संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील धरणे, पाझर तलाव, छोट्या-मोठ्या बंधाऱ्यांचा आढावा घेऊन त्याचा अहवाल पंधरवड्यात सादर करण्याच्या सूचना मांढरे यांनी दिल्या. या प्रकल्पांना सध्या काही धोका आहे का? गळती होत आहे का? गळती होत असल्यास त्याची कारणे काय? भविष्यात गळती होण्याची शक्यता आहे का? याची पडताळणी या समितीमार्फत करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात १८०० प्रकल्प

जिल्ह्यात छोटी-मोठी धरणे, पाझर तलाव, बंधारे १८०० च्या वर असल्याची माहिती प्रशासनाने दिली. मागील आठवड्यात त्र्यंबकेश्‍वरमधील बेरवळ आणि पेठ तालुक्यातील एक बंधारा फुटल्याची घटना घडली. या पार्श्‍वभूमीवर डागडुजीसाठी नोडल अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचा निर्णय हा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या बळकटीचा प्रश्‍न निकाली निघण्यास मदत होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com