औरंगाबाद विभागात उसाचे तीन लाख मेट्रिक टन गाळप

Three million metric tons of sugarcane silt by 12 factories in Marathwada, Khandesh
Three million metric tons of sugarcane silt by 12 factories in Marathwada, Khandesh

औरंगाबाद : या गाळप हंगामात ९ डिसेंबर अखेरपर्यंत औरंगाबाद प्रादेशिक सहसंचालक (साखर) मराठवाडा व खानदेशातील १२ साखर कारखान्यांनी ३ लाख ४ हजार १०४ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. या ऊस गाळपातून सरासरी ७.२५ टक्‍के साखर उताऱ्यानुसार २ लाख २० हजार ५७८ क्‍विंटल साखरेचे उत्पादन कारखान्यांनी घेतले आहे. 

यंदा औरंगाबाद, जालना, बीड, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला. परंतु, गाळपासाठी उपलब्ध क्षेत्र व सरासरी गाळप क्षमतेच्या तुलनेत कारखान्यांचे गाळप दोन महिनेही चालेल की नाही हा प्रश्‍न आहे. गतवर्षीपर्यंत साधारणत: २३ साखर कारखाने प्रत्यक्ष गाळप करीत होते. यंदा १९ साखर कारखान्यांनी गाळपासाठी परवाने मागितले. त्यापैकी १६ कारखान्यांना परवानगी देण्यात आली. त्यापैकी १२ कारखाने प्रत्यक्ष सुरू झाले. त्यामध्ये औरंगाबाद, नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येकी तीन, जालना, जळगावमधील प्रत्येकी एक, तर बीड जिल्ह्यातील चार कारखान्यांचा समावेश आहे. 

प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय औरंगाबादतंर्गत सहा जिल्ह्यात यंदा गाळपासाठी अंदाजे ८४ हजार ६५ हेक्‍टर उसाचे क्षेत्र आहे. 

नांदेड विभागातील लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यांत ८१ हजार ६४२ हेक्‍टर उसाचे क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध आहे. त्यापैकी मोठ्या प्रमाणात ऊस दुष्काळाच्या वनव्यात चारा म्हणून वापरला गेला. त्यामुळे यंदा गाळपासाठी उसाची पळवापळवी पहायला मिळेल. 

गतवेळीच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही कमी उसाचे क्षेत्र उपलब्ध आहे. अनेक कारखान्यांनी गाळप सुरू केल्याने दोन महिनेही ते सुरू राहील, की नाही हा प्रश्‍न आहे. एफआरपीपेक्षा जास्त दर देण्याची तयारी कारखाने उसाच्या कमतरतेमुळेच करीत आहेत. 

जिल्हानिहाय उसाचे गाळप (मेट्रीक टनामध्ये ) 

बीड ७५४१८.३
जालना २७६२०
औरंगाबाद ६७७२०
जळगाव   २०२१५
नंदुरबार ११३१३१

जिल्हानिहाय साखर उत्पादन (क्‍विंटलमध्ये)

नंदुरबार  ८८५२८
जळगाव  १४५५०
औरंगाबाद ४६४७५
जालना २४१००
बीड ४६९२५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com