agriculture news in marathi Three month's ration distribution starts in state | Agrowon

रेशनकार्डवर तीन महिन्यांचे धान्याचे वाटप सुरू

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 एप्रिल 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतून एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे एकत्रित आगाऊ धान्यवाटप राज्यातील रेशन कार्डधारकांना बुधवारपासून (ता.१) सुरू करण्यात आले आहे. 

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतून एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे एकत्रित आगाऊ धान्यवाटप राज्यातील रेशन कार्डधारकांना बुधवारपासून (ता.१) सुरू करण्यात आले आहे. 

पुणत जिल्ह्याबाबत बोलताना जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले, की मे व जून करिताचे ७७३७ टन गहू व ५०९६ टन तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांना १० एप्रिलपासून पुरविण्याचे नियोजन आहे. हे धान्य केवळ अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतील रेशन कार्डधारकांनाच वाटप करण्यात येणार आहे. सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी रेशन कार्डधारकांना धान्य वाटप करण्‍यासाठी निर्धारित वेळापत्रक तयार केले आहे. एका निर्धारित वेळापत्रकात दहा कार्डधारक धान्य घेण्यासाठी येतील.

सोशल डिस्टसिंगकरिता दुकानासमोर एक मीटर अंतर राखून मार्किंग करण्यात आले आहे.निर्धारित वेळापत्रकाप्रमाणे कार्डधारकांना दुकानदार दूरध्वनीकरुन बोलवून घेतील. कार्डधारकांनी धान्य घेण्यासाठी गर्दी करु नये, याकरीता कार्डधारकांच्या सोयीसाठी दुकानदारांना शासकीय अन्नधान्यासोबत इतर जीवनावश्यक वस्तू जसे डाळ, तेल, साखर, साबण, मीठ आदींची विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच रेशनकार्ड धारकांच्या तक्रार निवारणासाठी १०७७ हा टोल फ्री क्रमांक, तसेच ०२०- २६१२३७४३ हा मदत केंद्र क्रमांक  उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

साठेबाजी रोखण्यासाठी ११ पथके
जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी (ब्लॅक मार्केटिंग) रोखण्‍याकरीता परिमंडळनिहाय ११ पथकांव्दारे दररोज तपासणी करण्‍यात येत आहे. अन्नधान्य, भाजीपाला, दूध व औषधांची सद्यःस्थितीत एकूण २७ हजार २१० दुकाने सुरळीतपणे सुरु आहेत. सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही याकरिता बाजारसमिती, होलसेल व्यापारी, किराणा भुसार असोसिएशन, व्यापारी महासंघ यांच्‍याशी समन्वय ठेवण्‍यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...