agriculture news in Marathi three new varieties of Chrysanthemum will come soon Maharashtra | Agrowon

शेवंतीचे तीन वाण लवकरच

गणेश कोरे
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

शेतकऱ्यांना पारंपरिक वाणांना पर्याय म्हणून आणि शोभिवंत फुलांच्या बाजारपेठेची गरज यासाठी शेवंतीच्या कुंडीतील वाणांचे संशोधन हाती घेण्यात आले होते. या संशोधनातून तीन वाण उपलब्ध झाले असून, त्याच्या चाचण्यादेखील पूर्ण झाल्या आहेत. या वाणांना भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून मान्यता मिळाल्यानंतर हे वाण बाजारपेठेत उपलब्ध होतील. पारंपरिक शेतीबरोबरच शेतकऱ्यांना नर्सरी उद्योगांसाठी उद्युक्त करणारे हे वाण ठरतील. 
- डॉ. के. व्ही. प्रसाद, संचालक, पुष्पसंशोधन संचालनालय, पुणे

पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना पर्याय देण्यासाठी पुष्पसंशोधन संचालनालयाच्या वतीने लवकरच गुलाबी, फिकट पिवळा आणि गडद पिवळ्या शेवंतीसह एक असे तीन नवीन वाण उपलब्ध होणार आहेत.

या तीनही वाणांचे संशोधन अंतिम टप्प्यात आले असून, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या देशभरातील २२ संशोधन केंद्रावर आणि विविध हवामानात या तीनही वाणांच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. हे तीन ही वाण प्रामुख्याने नर्सरी आणि उद्यानांसाठीच्या वापरासाठी असणार आहेत. संशोधनपातळीवर सी-१, सी-२ आणि सी -३ या नावाने असणाऱ्या वाणांना मराठमोळी ऐतिहासिक लोकप्रिय नावे मिळण्याची शक्यता आहे.

शेवंतीच्या नवीन संशोधनाबाबत संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यांनी ‘ॲग्रोवन’ला माहिती दिली. डॉ. प्रसाद म्हणाले, ‘‘पुष्पसंशोधन संचालनालयात शेवंतीच्या देशभरात उपलब्ध असलेल्या १५० वाणांची लागवड करण्यात आली आहे. मात्र, पुण्यात संशोधन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शेवंतीचे मुख्य संशोधक तारकनाथ सहा यांनी नवीन वाणांचे संशोधन हाती घेतले. यासाठी पर परागीकरण (क्रॉस पॉलिनेशन) द्वारे वाणांचे संशोधन चार वर्षांपासून सुरू होते. 

गले वाण तयार झाले असून, यामध्ये सी-१ ही गडद पिवळी, सी -२ हे गुलाबी आणि सी -३ ही आकाराने लहान आणि जास्त उत्पादन देणारी गडद पिवळ्या वाणांचा समावेश आहे. या तीनही वाणांच्या चाचण्या भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या देशभरातील २२ संशोधन केंद्रावर चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्या यशस्वी झाल्या असून, हे वाण आता अंतिम मान्यतेसाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे पाठविण्यात येणार आहे.’’ 

‘‘महाराष्ट्रातील शेतकरी, व्यापारी हे शेवंतीच्या सुट्या फुलांच्या आणि पांढऱ्या आणि पिवळ्या हा पारंपारिक वाणांवरच अवलंबुन आहेत. यामध्ये बदल घडविण्यासाठी केवळ सुट्या फुलांसाठीच शेवंतीचे उत्पादन घेतले जाऊ नये आणि बाजारपेठेतील मागणीनुसार शेवंतीचे उत्पादन व्हावे, यासाठी नर्सरी आणि उद्यान क्षेत्रासाठी कुंडीतील शेवंतीच्या वाणांवर संशोधन हाती घेण्यात आले आहे.

नर्सरी आणि उद्यान क्षेत्राकडून सजावटीसाठी कुंडीतील वाणांची मागणी होत होती. त्यानुसार हे वाण विकसित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना पारंपरिक सुट्या फुलांच्या शेतीला पर्याय म्हणून हे नवीन वाण उपयुक्त ठरतील,’’ असा विश्‍वास देखील डॉ. प्रसाद यांनी व्यक्त केला.  

अशी आहेत वैशिष्ट्ये 
सी -१ :
फिकट पिवळा रंगाचा असणाऱ्या फुलाला मध्यभागी गडद पिवळ्या आकाराची रिंग असणार आहे. यामुळे हे फूल आर्कषक दिसते. एका रोपाला साधारण २०० फुले लागतात, हार आणि कुंडीसाठी उपयुक्त आहेत. तसेच याला सौम्य सुंगध असल्याने घरामध्ये ठेवण्यासाठी मागणी मिळेल. या रोपाची उंची ६५ ते ९३ सेंमी, व्यास ६.८३ सेंमी तर विस्तार ६० सेंमी एवढा असणार आहे. 
सी -२  : रंगाने गुलाबी असलेले फूल अधिक आकर्षक दिसते. रोपांची उंची साधारण असून, यंदा जास्त झालेल्या पावसामुळे चाचण्या अद्याप अंतिम झालेल्या नसून, अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेले नाहीत. 
सी -३ : हे फूल रंगाने गडद पिवळे असून, या झाडाचा डोलारा मोठा आहे. या झाडाला फुले लागल्यानंतर झाडाचे एकही पान दिसत नाही. तर साधारण १७५ फुले एका वेळी लागतात. झाडाची उंची ५२.१ सेमी, डोलारा ४३.५३ सेमी. तर फुलांचा व्यास ५.८०सेमी एवढा आहे. 

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लागवडीसाठी योग्य 
हे तीन ही वाण नोव्हेंबर डिसेंबर महिन्यांत लागवडीसाठी योग्य असल्याची शिफारस पुष्पसंशोधन संचालनालयाने केली आहे. या वाणांचे काड्यांद्वारे रोपे केली जाणार असून, थेट रोपेच शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत.


इतर अॅग्रो विशेष
जवानांनंतर शेतकऱ्यांचे ‘संचलन’ नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर...
लाल वादळ मुंबईत धडकले नाशिक : दिल्ली येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी...
शेतीपंप वीजबिले तपासली जाणार; चुकीची...कोल्हापूर : ‘‘राज्य सरकारने कृषिपंप वीजजोडणी धोरण...
राज्यात एफआरपीचे ७७ टक्के वितरणपुणे : साखर कारखान्यांकडे लक्षावधी टन साखर पडून...
पूर्व विदर्भात गुरुवारी पावसाची शक्यतापुणे : मराठवाडा ते बिहार या दरम्यान कमी दाबाचा...
देशातील साखर उत्पादन ‘सुसाट’; १४२ लाख...कोल्हापूर : यंदाच्या हंगामातील साखर उत्पादनाने...
पशुसंवर्धन विभागात ३० टक्‍के पदे रिक्‍तनागपूर : पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या दुर्दशेसोबतच...
दिल्लीतील ट्रॅक्‍टर परेडला हिरवा कंदील...नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले...
बारामतीत अवतरले ‘अॅग्रोवन मार्ट’बारामती, जि. पुणे : शेतकऱ्यांच्या सर्व गरजांची...
औरंगाबादेत होणार अंडीपुंजनिर्मिती केंद्रऔरंगाबाद : रेशीम शेती व उद्योगाला चालना...
गोंदियात किमान तापमान १० अंशांवरपुणे : उत्तर भारतातील राजस्थान, पंजाब उत्तर...
शेतकऱ्यांच्या २६ च्या ‘ट्रॅक्टर परेड’...नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी...
केंद्राच्या स्पष्ट धोरणाअभावी ‘जीएम’...नागपूर ः एकीकडे जनुकीय सुधारित (जीएम) पिकांच्या...
लोक सहभागातून जैवविविधता, पर्यावरण...ग्रामीण भागातील जैवविविधतेच्या संवर्धनामध्ये पाच...
अपात्र लाभार्थ्यांना कोणी केले मालामाल?ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला...
ग्लोबल अन् लोकल मार्केटमका आणि सोयाबीनच्या जागतिक उत्पादनात घट होण्याची...
निर्णय आता तुमच्या हाती : केंद्र सरकारनवी दिल्ली ः शेतकरी नेते ‘कृषी कायदे रद्द करणे...
शेतमाल निर्यात खर्च झाला दुप्पट नाशिक : लंडनमध्ये डिसेंबरअखेर कोरोनाचा नव्या...
बर्ड फ्लूने १३ हजार पक्ष्यांचा मृत्यू पुणे : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लू...
कृषिपंपाच्या थकबाकीची आता ऊसबिलातून...सोलापूर :  कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी आणि...