Agriculture news in Marathi Three officers convicted for misconduct in Akole taluka | Agrowon

अकोले तालुका गैरव्यवहार प्रकरणी तीन अधिकारी दोषी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

नगर ः अकोले तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायती व पंचायत समितीच्या कार्यालयातील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण झालेली आहे. पहिल्या अहवालात तीन ग्रामसेवक दोषी आढळून आल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दुसऱ्या अहवालात तीन अधिकारी दोषी असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. त्यावर आता मुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

नगर ः अकोले तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायती व पंचायत समितीच्या कार्यालयातील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण झालेली आहे. पहिल्या अहवालात तीन ग्रामसेवक दोषी आढळून आल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दुसऱ्या अहवालात तीन अधिकारी दोषी असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. त्यावर आता मुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

नगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायती व पंचायत समितीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद सदस्य सुषमा दराडे यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण केले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एकूण तीन पथके नियुक्त केली होती. त्यातील पहिल्या पथकाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला आहे. त्यात तीन ग्रामसेवक दोषी आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. 

दुसऱ्या चौकशी समितीच्या चौकशीमध्येही काही अंशी अपहार स्पष्ट झाला आहे. त्यामुळे तीन अधिकाऱ्यांवर दोषी असल्याचा ठपका ठेवून तसा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. पाटील यांना सादर करण्यात येणार आहे. त्यावर त्यांच्याकडून काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अकोले तालुक्‍यातील गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशी समितीत पारनेरमधील काही अधिकाऱ्यांचा समावेश असल्यामुळे, अहवालही पारनेरमध्ये तयार केला जात आहे. त्यामुळे पारनेरमध्ये अकोल्यातील लोकांचा वावर वाढला आहे. 

पारदर्शकतेमुळे लागतोय अवधी 
पाच ग्रामपंचायती व गटविकास अधिकाऱ्यांविरोधात गैरव्यवहाराची तक्रार असल्याने, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये सर्व बाबींची पडताळणी करूनच संबंधितांना दोषी ठरविले जात आहे. पारदर्शक चौकशी सुरू असल्याने अहवाल तयार होण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात आले.


इतर बातम्या
पोषण आहारात ‘महानंद’ टेट्रापॅक दुधाचा...मुंबई : महानंद दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा...
बुलडाण्यात जिल्हाधिकारी चंद्रा यांनी...बुलडाणा  ः कृषी विभागामार्फत जिल्ह्यात...
‘पीएम-किसान’चा १२ कोटी शेतकऱ्यांना...नवी दिल्ली: शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदीसाठी...
नैसर्गिक रंग बनविण्याचे महिलांनी...अकोला  ः पुढील महिन्यात रंगपंचमीचा उत्सव जवळ...
आंबा, काजू क्लस्टरसाठी रत्नागिरी,...रत्नागिरी : विविध देशांमधील आंबा, काजूची निर्यात...
बदलत्या हवामानाचा गव्हाला फटकाअमळनेर, जि. जळगाव  : तालुक्‍यात गहू पिकाची...
भंडारा जिल्ह्यात धान विक्रीचे १११...भंडारा  ः शासनाने हमीभावात बोनसच्या...
पंजाबमध्ये भूमिहीन शेतमजुरांना कर्जमाफीचंदीगड, पंजाब: राज्याचा २०२०-२१ चा १.५४ लाख...
देशात ११० लाख टन हरभरा उत्पादनाचा अंदाजनवी दिल्ली: देशात यंदा हरभरा उत्पादनात वाढ...
‘पोकरा’तील सामुदायिक शेततळे, शेळीपालन...अकोला ः राज्यात राबविल्या जात असलेल्या नानाजी...
लाल कंधारी, देवणी गोवंश संवर्धनासाठी...परभणी  ः मराठवाडा विभागातील लाल कंधारी आणि...
गोंदिया जिल्ह्यात भरडाईच्या...गोंदिया  ः भरडाईसाठी धानाची उचल होण्याची गती...
आटपाडी तालुक्यात बंद साखर कारखान्यांचा...खरसुंडी, जि. सांगली : टेंभू योजनेच्या खात्रीशीर...
एक लाख टन मका म्यानमारमधून आयातनवी दिल्ली: देशात यंदा कमी उत्पादन झाल्याने...
सेवा हमी कायदा नागरिकांपर्यंत पोचवून...नाशिक  : सेवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार...
चांदवड येथे साडी नेसून आंदोलननाशिक : चांदवड खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून...
ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावीमुंबई  ः ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी ही...
राज्यातील बावीस कारखान्यांचा गाळप हंगाम...कोल्हापूर  : राज्यातील ऊस गाळप हंगाम हळूहळू...
नांदेड जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची...नांदेड : यंदा उन्हाळी हंगामात जिल्ह्यात गुरुवार (...
केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा :...हिंगोली : ‘‘केंद्र शासन पुरस्कृत योजनांचा लाभ...