agriculture news in marathi Three renowned institution from pune comes forward for Corona Diagnosis on social cause | Agrowon

कोरोनाच्या निदानासाठीच्या ‘मायलॅब'ला चाचणी किटसाठी अभिजित पवार, पूनावाला यांचे सहकार्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

कोरोना निदानाची देशातील पहिले किट तयार करणारी ‘मायलॅब’ फार्मास्युटिकल्स कंपनी, जगातील १७०हून अधिक देशांमध्ये लसीचा पुरवठा करणारी ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (एसआयआय) आणि ‘एपी ग्लोबाले’ या संस्था समाजकार्यासाठी पुढे सरसावल्या आहेत.

पुणे ः देशातील कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाच्या अचूक निदानासाठी पुण्याने आता आघाडी घेतली आहे. कोरोनाच्या उद्रेकातून देशावर ओढवलेल्या संकटात नागरिकांचे सामाजिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पुण्यातील तीन दिग्गज संस्था एकत्र आल्या आहेत. त्यात कोरोना निदानाची देशातील पहिले किट तयार करणारी ‘मायलॅब’ फार्मास्युटिकल्स कंपनी, जगातील १७०हून अधिक देशांमध्ये लसीचा पुरवठा करणारी ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (एसआयआय) आणि ‘एपी ग्लोबाले’ या संस्था समाजकार्यासाठी पुढे सरसावल्या आहेत.

देशात कोरोना विषाणूंचा फैलाव वेगाने होत आहे. त्यात सुरुवातीला परदेशातून प्रवास करून आलेल्या किंवा कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती यांचीच फक्त वैद्यकीय चाचणी केली जात होती. कारण, या कोरोना तपासण्याच्या किट आयात कराव्या लागत होत्या. कोरोना निदान किट आता पुण्यातील ‘मायलॅब’ कंपनीने विकसित केले आहे. कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी करणे या किटमुळे शक्‍य होणार आहे. किटचे उत्पादन वाढविण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ‘मायलॅब’चे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ यांच्याबरोबर ‘एसआयआय’चे अदर पूनावाला, ‘एपी ग्लोबाले’ आणि ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी योगदान दिले आहे.

‘‘कोरोना किटची गुणवत्ता सर्वोत्तम राखणे, हे यातील सर्वांत मोठे आव्हान आहे. त्यासाठी जगातील १७० पेक्षा जास्त देशांमध्ये लस वितरित करणाऱ्या ‘एसआयआय’ पेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. तसेच, या किटच्या उत्पादनासाठी निधी उभारणे, मार्गदर्शन हे देखील महत्त्वाचे आहे. तसेच या तिन्ही संस्थांना एकत्र आणण्यासाठी पवार यांचे योगदान मोलाचे आहे,’’ असे रावळ यांनी स्पष्ट केले.

‘‘कोरोनाच्या किटची देशातील गरज पूर्ण करणे, याला प्राधान्य आहे. त्यासाठी प्रत्येक आठवड्याला २० लाख युनिट्‌स उत्पादन करण्यापर्यंत क्षमता वाढवत आहोत. देशात रोगनिदानासाठी किटची कमतरता भासणार नाही,’’ असेही रावळ यांनी सांगितले.

एकत्र आल्याने काय होणार?
देशातील कोरोनाचा संशय असलेल्या प्रत्येक रुग्णाची तपासणी झाली पाहिजे. त्यासाठी हे कीट लवकरात लवकर प्रयोगशाळांपर्यंत पोहोचले पाहिजे, तेही कमी किमतीत. या तिन्ही संस्था एकत्र येण्यामागचा हा उद्देश आहे.

मायलॅब
कोरोनाचे निदान करणारे किट तयार करणारी मायलॅब ही देशातील पहिली कंपनी ठरली. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून सोप्या पद्धतीने अचूक रोगनिदान करणे, तेही अत्यंत कमी खर्चात उपलब्ध करणे, हा ‘मायलॅब’चा उद्देश आहे. रुग्णाच्या नमुन्यातून त्याचे रोगनिदान करणारी यंत्रणा प्रयोगशाळेत विकसित करण्यावर भर दिला आहे. रोगनिदान, औषधनिर्माण आणि विकास, जैववैद्यकीय संशोधन, अन्न सुरक्षा ॲग्री जीनोमिक्‍स अशा विविध ठिकाणी कंपनी योगदान देत आहे. या प्रक्रिया जलद होतील आणि त्रुटी कमी असतील, या दृष्टीने कंपनी प्रयत्न करत आहे.

अदर पूनावाला
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदर पूनावाला हे भारतातील अग्रगण्य उद्योजक आहेत. ‘अदर पूनावाला क्‍लीन सिटी’ यासह अनेक सामाजिक प्रकल्पांमध्ये त्यांचा पुढाकार आणि ‘अदर पूनावाला महाराष्ट्र टेनिस ॲकॅडमी’, पूनावाला फाउंडेशन, आरोग्य, शिक्षण, पाणी, स्वच्छता आणि पर्यावरण यांत त्यांचे योगदान आहे.

एपी ग्लोबाले
एपी ग्लोबाले, एक सकारात्मक ‘इम्पॅक्‍ट बिझिनेस सोल्यूशन्स कंपनी’ आहे. ‘सकाळ’च्या माध्यमातून ‘मायलॅब’ ही देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर कोरोना किट प्रयोगशाळांपर्यंत पोचविण्यात मदत करणार आहे.

किट कमी पडू देणार नाही ः रावळ
पुण्यातील 'मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन'ला जगविख्यात 'सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'चे (एसआयआय) मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला आणि 'एपी ग्लोबाले'चे आणि 'सकाळ'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे. याबद्दल बोलताना 'मायलॅब'चे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ यांनी 'सकाळ'शी संवाद साधला. "देशात कोरोनाचे निदान करण्यासाठी किट कमी पडू देणार नाही,'' असा विश्‍वासही यावेळी रावळ यांनी व्यक्त केला.

प्रश्‍न ः अदर पूनावाला आणि अभिजित पवार हे तुम्हाला कोरोना किटमध्ये कशी मदत करणार?
उत्तर ः देशाला सध्या कोरोना विषाणूंच्या संसर्गाचे निदान करणारे किट अत्यावश्‍यक आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्पादनाची गरज आहे. ते करत असताना किटची गुणवत्ता राखणे नितांत गरजेचे आहे. 'एसआयआय' आणि 'एपी ग्लोबले'यांचे मार्गदर्शन मिळेल. आम्ही उत्पादन करत असताना पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 'एसआयआय' ही लस निर्माण करते तर, आम्ही रोगनिदान क्षेत्रात आहोत. हे सहकार्य नक्कीच आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

प्रश्‍न ः 'एसआयआय' आणि 'एपी ग्लोबाले' यांची भूमिका काय?
उत्तर ः कोरोना उद्रेकाचे संकट आपल्या उंबरठ्यावर आहे. या संकटाशी मुकाबला करण्याची वेळ आहे. देशातील कोरोनाचा उद्रेक नियंत्रित करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यानंतर जगातील इतर देशांनाही मदतीचा हात देता येईल. अशा वेळी 'एसआयआय' आणि 'एपी ग्लोबले' यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.

प्रश्‍न ः कोरोनाचा उद्रेक नियंत्रित करण्यासाठी जगभर प्रयत्न सुरू आहेत. भारतात होत असलेल्या उपाययोजनांबद्दल तुम्ही काय म्हणाल?
उत्तर ः मोठ्या प्रमाणात तपासणी करणे, हा सध्याचा प्रभावी मार्ग आहे. या रोगाचा संसर्गाचे नेमके प्रमाण यातून समजेल. इतर देशांनीही नागरिकांची मोठ्या प्रमाणात तपासणी केली. त्यातून रोगाचा संसर्ग नियंत्रित करण्यात यश आले. आता आपल्याकडे अचूक रोगनिदासाठी किट आहे. या किटची कमतरता आम्ही पडू देणार नाही. 


इतर अॅग्रो विशेष
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...