agriculture news in Marathi up to three rupees hike in ethanol rate Maharashtra | Agrowon

इथेनॉल दरात तीन रुपयांपर्यंत वाढ

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

यंदाच्या हंगामात इथेनॉलनिर्मितीला गती देण्यासाठी केंद्राने पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींविषयक समितीने इथेनॉल दरात लिटरमागे दोन ते तीन रुपये वाढीस गुरुवारी (ता.२९) मंजुरी दिली. 

कोल्हापूर : यंदाच्या हंगामात इथेनॉलनिर्मितीला गती देण्यासाठी केंद्राने पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींविषयक समितीने इथेनॉल दरात लिटरमागे दोन ते तीन रुपये वाढीस गुरुवारी (ता.२९) मंजुरी दिली. एक डिसेंबर २०२० ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीसाठी ही दरवाढ लागू असेल. 

यंदा देशात साखरेच्या विक्रमी उत्पादनाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे केंद्राने इथेनॉलनिर्मितीकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली आहे. कारखान्यांना इथेनॉलनिर्मितीला बळ मिळावे यासाठीच केंद्राने तातडीने येणाऱ्या वर्षासाठी इथेनॉलच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या कारखान्यांकडून या वाढीव दराने इथेनॉल खरेदी करु शकतील. गेल्या दोन महिन्यांपासून तेल मंत्रालयाने इथेनॉल दरवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता. परंतु त्यावर निर्णय झाला नव्हता. अखेर केंद्राने हालचाली करीत ही दरवाढ लागू केली.

देशातील सर्व डिस्टिलरी या दरवाढीचा लाभ घेण्यास सक्षम असतील. त्यांनी मोठ्या प्रमाणात ‘ईबीपी’ प्रोग्रामसाठी इथेनॉल पुरवठा करणे अपेक्षित आहे. देशात ज्या कारखान्यांकडे शेतकऱ्यांची थकबाकी आहे. त्या कारखान्यांना याचा लाभ व्हावा या दरवाढीचा मुख्य उद्देश असल्याचे तेल मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. प्रमुख तेल कंपन्यांनी इथेनॉलची खरेदी केल्यास इंधनाच्या आयातीचा भुर्दंडही कमी होण्याची शक्‍यता आहे. अनेक फायदेशीर बाबींमुळेच या दरवाढीला तातडीने मान्यता देण्यात आली. 

गेल्यावर्षी ब्राझीलने साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी करुन इथेनॉलनिर्मिती केली होती. तोच पॅटर्न केंद्र सरकारही यंदा राबविण्याचा प्रयत्न करत आहे. त्या दृष्टीने इथेनॉल बाबतचे प्रत्येक निर्णय यापुढे केंद्र गतीने घेण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

२०१४ पासून इथेनॉलनिर्मितीबाबत केंद्रीय पातळीवरून प्रयत्न होत आहेत. गेल्या चार वर्षांत तेल कंपन्यांनी इथेनॉलचे कंत्राट ३४ कोटी लिटर वरुन १९५ कोटी पर्यंत वाढविले आहेत. यात अजूनही वाढ करण्यासाठी केंद्र पावले उचलत असल्याचे सूत्रांनी सांगितले. एफआरपी आणि साखरेच्या विक्री किमतीतही बदल होत असल्याने इथेनॉलच्या किमतीत बदल करण्यात येत असल्याचे केंद्रीय पातळीवरून सांगण्यात आले.

अशी आहे दरवाढ
सी-हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलची किंमत लिटरला ४३.७५ वरून ४५.६९ इतकी करण्यात आली आहे. बी-हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर ५४.२७ वरून ५७.६१ रुपये तर उसाचा रस, साखरेपासून तयार होणाऱ्या इथेनॉलची किंमत ५९.४८ वरून ६२.४५ रुपये प्रतिलिटर करण्यात आली आहे. इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रमांतर्गत या दरवाढीस मान्यता देण्यात आली.


इतर अॅग्रो विशेष
केंद्राचा चर्चेचा प्रस्ताव नाकारला;...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या वतीने...
...येथे कांदा रोपे राखणीसाठी...विसापूर, जि. सातारा  : सोन्याचे दाग-दागिने,...
कृषी विभागात आगामी बदल्या समुपदेशनाने...पुणे : कोविड-१९ साथीमुळे कृषी विभागात यंदा...
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...पुणे :  निवार चक्रीवादळाचा प्रभाव निवळत...
कृषी पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश...पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत...
सातत्य राखलेले पशुपालन ठरले शेतीलाही...यवतमाळ जिल्ह्यातील लोही (ता. दारव्हा) येथील...
अतिदुर्गम भागात दुग्धव्यवसायातून...आदिवासी व अतिदुर्गम असलेल्या शेलद- मुंढेवाडी (ता...
प्रक्रिया उद्योगाअभावी संत्रा...नागपूर : राज्यात सध्या संत्र्याखालील सर्वाधिक...
वीस हजार अन्न प्रक्रिया उद्योग होणार...पुणे : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग उन्नयन...
महाबळेश्वरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर...मुंबई : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर आता...
पदवीच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश...पुणे ः कृषी व मत्स्य विद्याशाखेच्या पदवी...
दुर्गम भागातील गावकऱ्यांनी स्वतःच केला...जामली, जि. अमरावती ः चिखलदरा तालुक्‍यातील...
बारदान्याच्या ६५ कोटींची शेतकऱ्यांना...भंडारा: गेल्या खरीप व रब्बी हंगामात स्वतःचा...
ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक...सांगली ः : मागील दोन दिवसांतील थंड वारे, ढगाळ...
ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरला पसंती पुणे : मजूर टंचाईमुळे राज्यातील साखर...
‘ऑपरेशन ग्रीन’ डिसेंबरपर्यंत चालणार पुणे : ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत भाजीपालावर्गीय...
शासकीय केंद्रातं खरेदीत कापूस कटतीतून...जळगाव ः शासकीय कापूस खरेदीने शेतकऱ्यांना आधार...
गगनबावड्यात यंदा सर्वाधिक पाऊस पुणे ः देशात यंदा परतीचा मॉन्सून अधिक काळ...
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...