चोपडा, मुक्ताईनगर, रावेर तालुक्यात वादळाचा तिनदा तडाखा

जळगाव ःगुरुवार (ता.२७) शुक्रवार (ता.२८) व शनिवारी (ता.२९) असे सलग तीन दिवस रावेर, मुक्ताईनगर, चोपडा, यावल भागाला वादळी पावसाचा फटका बसला.
Three storms hit Chopda, Muktainagar, Raver taluka
Three storms hit Chopda, Muktainagar, Raver taluka

जळगाव ः  खानदेशात पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावत आहे. त्यात पिकांसह घरांचे नुकसान होत आहे. गुरुवार (ता.२७) शुक्रवार (ता.२८) व शनिवारी (ता.२९) असे सलग तीन दिवस रावेर, मुक्ताईनगर, चोपडा, यावल भागाला वादळी पावसाचा फटका बसला. त्यात विविध  गावांमध्ये पिके, शेतातील चाऱ्याची हानी झाली. पिकांचे मोठे नुकसान झाले. 

चोपडा तालुक्याच्या पूर्व भागात वादळी पाऊस झाला. त्यात वेले, आखतवाडे, वर्डी, विष्णापूर या भागात नुकसान झाले. परिसरातील केळी,  भाजीपाला पिकांनाही फटका बसला. शेतांमध्ये वीजतारा तुटून वीजपुरवठा काही गावांमध्ये खंडित झाला. जीवित हानी सुदैवाने टळली. परंतु वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतात लागवड केलेल्या कापूस पिकाचे सिंचन कसे करणार, असा प्रश्न आहे. तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे. 

गुरुवारी (ता.२७) जिल्ह्यात रावेर, मुक्ताईनगर भागात वादळ व पावसाने दोन हजार ४२ हेक्टरवरील केळी पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाकडे सादर झाला आहे. दोन हजार ९८४ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. केळीचे अधिक नुकसान झाले आहे. रावेरात २३ गावांमध्ये ९४९ हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले. त्याचा फटका ७५७ शेतकऱ्यांना बसला आहे. मुक्ताईनगरात दोन हजार ३५ शेतकऱ्यांच्या १२८५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. 

या नुकसानीची पाहणी प्रशासनाने पुन्हा करण्याची आहे. नव्याने अहवाल तयार करावा लागणार आहे. कारण नुकसानग्रस्त भागात पुन्हा वादळ झाले. आणखी इतर गावांतही वादळी पाऊस झाला आहे.  रविवारी (ता.३०) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकसानग्रस्त भागात पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. पण तातडीने चोपडा, मुक्ताईनगर, रावेरातील नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

विरोधी पक्षनेते आज पाहणी करणार

मंगळवारी (ता.१) विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे रावेर, मुक्ताईनगर व लगतच्या भागात पीक नुकसानीची पाहणी करणार आहेत. या वेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com