रत्नागिरीत तीन हजार हेक्टर भात क्षेत्र वाढले

रत्नागिरी ः जिल्ह्यात दरवर्षी ६७ हजार ५०० हेक्टरवर भात लागवड केली जाते; मात्र यंदा ७० हजार ५७२ हेक्टरवर लागवड झाली आहे.
Three thousand Hectare paddy area increased in Ratnagiri
Three thousand Hectare paddy area increased in Ratnagiri

रत्नागिरी ः जिल्ह्यात दरवर्षी ६७ हजार ५०० हेक्टरवर भात लागवड केली जाते; मात्र यंदा ७० हजार ५७२ हेक्टरवर लागवड झाली आहे. तुलनेत तीन हजार हेक्टरवर वाढ झाली आहे. कोरोना काळात अनेकजण नोकऱ्या, रोजगाराला मुकल्यानंतर शेतीकडे वळले. परिणामी, गावागावातील रिकामे राहिलेले शेतीक्षेत्र लागवडीखाली आले.

कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने भात लागवड केली जाते; परंतु गेल्या काही वर्षांत भातशेती ही खर्चिक होऊ लागली. त्यामुळे गावागावातील जमीन पडीक राहू लागली होती. गावातील तरुण रोजगारासाठी मुंबईकडे वळतात. जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात स्थलांतरात रत्नागिरीचा क्रमांक लागतो. दरवर्षी जिल्ह्यात ६७ हजार ५०० हेक्टरवर भात लागवड केली जाते. यंदा त्यात ३ हजार ०७२ हेक्टरने क्षेत्र वाढलेले आहे.

गतवर्षीपासून कोरोनामुळे टाळेबंदी झाली आणि मुंबईकर चाकरमानी गावाकडे परतले. गावात आल्यानंतर करायचे काय? असा प्रश्‍न त्यांच्यापुढे होता. त्यामुळे अनेकांनी पडीक जमिनीत शेती करण्यास सुरवात केली. शेतीसाठी घरात माणसे उपलब्ध राहिल्यामुळे कामे करणेही शक्य झाले. गतवर्षी कृषी, महसूल विभागाकडून झालेल्या पाहणीत तेवढी वाढ दिसून आली नव्हती. यावर्षी कृषी विभागाने ऑनलाइन नोंदणीचा फंडा राबवला होता.

कृषी पर्यवेक्षक प्रत्यक्ष जागेवर जाऊन भातशेतीची नोंदणी करत होते. परिणामी, पडीक जमिनीवर झालेल्या लागवडीचीही नोंद झाली. प्रत्यक्षात यंदा किती भात लागवडीत वाढ झाली, ते समजू शकले. त्याचबरोबर निसर्गानेही बळीराजाला साथ दिली. 

यंदा तौक्ते वादळामुळे १६ मे रोजी पाऊस झाला. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरवात झाली. भाताच्या पेरण्या लवकर झाल्या. कोरोनाचे निर्बंध काही प्रमाणात ‘जैसे थे’ असल्याने काही चाकरमानी अजूनही गावातच आहेत. त्यामुळे लागवडीकडील कल यंदा अधिक आहे, 

अनेक चाकरमानी कोरोनामुळे गावाकडेच राहिले आहेत. पडीक जमिनी भात लागवडीखाली आल्या आहेत. त्यामुळे यंदा क्षेत्रात वाढ झाली आहे.  - विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com