पुणे जिल्ह्यातील तीन हजार कामे पूर्णत्वाच्या मार्गावर

शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत विविध प्रकारच्या तब्बल १७ हजार ७१७ कामांना प्रशासकीय मान्यता दिली. तर, त्यातील १३ हजार ९३५ कामांना तांत्रिक मान्यता देऊन दररोज शंभरपेक्षा अधिक कामांची वर्कऑर्डर देण्याचा विक्रम करण्यात आला आहे.
Three thousand works in Pune district on the way to completion
Three thousand works in Pune district on the way to completion

पुणे : जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत विविध प्रकारच्या तब्बल १७ हजार ७१७ कामांना प्रशासकीय मान्यता दिली. तर, त्यातील १३ हजार ९३५ कामांना तांत्रिक मान्यता देऊन दररोज शंभरपेक्षा अधिक कामांची वर्कऑर्डर देण्याचा विक्रम करण्यात आला आहे. त्यामुळेच जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजारांहून अधिक कामे पूर्णत्वास गेली. तर, प्रत्यक्षात ६८२ कामे सुरू झाली आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कामांना गती मिळाली. दरवर्षी निविदा न निघाल्यामुळे अखर्चित निधीचा आकडा मोठा होता, मात्र यावर्षी जास्तीत जास्त निधी खर्च करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामामुळे कामांना गती मिळाली. त्यामध्ये प्रत्यक्षात सीईओ यांनी गावभेटी देऊन कामांची पाहणी केली. जिल्हा परिषदेकडे कामांचा ताण मोठा आहे. गेल्या वर्षी कोरोना काळात अनेक विकासकामे प्रलंबित राहिली.

पुणे जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती, राज्य आणि केंद्र सरकार यांच्याकडून निधी प्राप्त झाला होता. त्या निर्धीतर्गत येत्या मार्च अखेरपर्यंत निधी खर्च करण्यात यावा आणि विकास कामे पूर्ण करण्यात यावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शंभर दिवस कार्यक्रम ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत सप्टेंबरपासून ते ३१ डिसेंबरपर्यंत सुमारे १७ हजार १७१ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

पुणे जिल्हा परिषदेने सर्वाधिक तांत्रिक मान्यता देऊन १३ हजार ९३५ कामांचे कार्यादेश देण्याचा विक्रम केला. दररोज शंभरपेक्षा अधिक कामांचे कार्यादेश दिले. या कामांसाठी दोन ते अडीच वर्षातील सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. दोन हजार कोटींच्या कामांचे कार्यादेश दिले आहेत. - आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com