agriculture news in marathi Three villages in Malegaon banned | Page 2 ||| Agrowon

मालेगावातील तीन गावे प्रतिबंधित

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

मालेगाव, जि. नाशिक: ‘‘वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार मालेगाव तालुक्यातील रावळगाव, लोणवाडे व चंदनपुरी शिवारातील मडकी महादेव वस्तीच्या परिसर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे, असे उपविभागीय दंडाधिकारी विजयानंद शर्मा यांनी जाहीर केले. 

मालेगाव, जि. नाशिक: ‘‘वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार मालेगाव तालुक्यातील रावळगाव, लोणवाडे व चंदनपुरी शिवारातील मडकी महादेव वस्तीच्या परिसर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे, असे उपविभागीय दंडाधिकारी विजयानंद शर्मा यांनी जाहीर केले. 

कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण ज्या ठिकाणी राहतात, ते ठिकाण केंद्र बिंदू घोषित करून त्यापासून १ किलोमीटर अंतरातील परिघाचे क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. तर, त्यास लागून ३ किलामीटर परिघातील क्षेत्र हे बफरझोन म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद कले आहे. या क्षेत्रात पूर्णपणे संचारबंदी लागू राहील. 

या क्षेत्रात प्रवेश आणि निर्गमन करण्यास बंदी असेल. मात्र, अत्यावश्यक सेवेची दुकाने, आस्थापना जसे किराणा दुकाने, भाजीपाला, दवाखाने, मेडिकल, दुध डेअरी यांना निर्धारित करून दिलेल्या वेळेत मुभा देण्यात आली आहे. या ठिकाणी शासनाच्या नियमाप्रमाणे सुरक्षित अंतर पाळणे आवश्यक राहील. या परिसरातील नागरिकांना सुरक्षेसाठी मास्कचा वापर बंधनकारक राहील, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

संक्रमणाचा पुढील प्रसार रोखण्यासाठी वैद्यकीय पथकांच्या निर्देशांचे पालन करावे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेव्दारे या परिसरातील संपूर्ण स्वच्छता करुन अहवाल सादर करावा. नियुक्त करण्यात आलेल्या चेकपोस्टसह संबंधित पथकातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामकाज करतांना वैयक्तिक सुरक्षा उपकरणे आणि शासनाच्या आरोग्य विभागाचे मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत. 


इतर बातम्या
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
चक्रीवादळ अलिबागजवळ १ ते ३च्या दरम्यान...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
टोळधाडीवर दोन दिवसात नियंत्रण मिळविणार नागपूर ः पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गेल्या...
दीडपट 'एमएसपी' म्हणजे निव्वळ धूळफेक :...पुणे: मोदी सरकारने खरिपासाठी जाहीर केलेल्या किमान...
मॉन्सून कर्नाटकात आज धडकणारपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
‘निसर्ग’ चक्रीवादळ आज अलिबागजवळ धडकणार पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटकच्या...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
बॅंकांसाठी आठ-अ, फेरफार उतारे थेट...पुणे: सातबारा संगणकीकरण उपक्रमाला लॉकडाउनमुळे...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
कापूस, सोयाबीन उत्पादक विमा...गडचिरोली: धान उत्पादक ३४ हजार शेतकऱ्यांना सुमारे...
हिंगोली जिल्ह्यात ५९ कोटींचे पीककर्ज...हिंगोली   ः हिंगोली जिल्ह्यातील विविध...
अकोला जिल्हा परिषदेचा ७६ कोटींचा निधी...अकोला  ः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या...
जालन्यात पाच हजार टन खते एकाच दिवशी...जालना  : जिल्ह्यात एकाच दिवशी पाच हजार...
नांदेडमध्ये ४७ कोटी ४७ लाखांचे पीक कर्ज...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बॅंकांनी...
बुलडाणा जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत...बुलडाणा  : यंदा जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाऊस...