‘भारत बंद’च्या माध्यमातून  केंद्र सरकारचा निषेध 

केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे व वीज क्षेत्राचे खासगीकरण विधेयक रद्द करावे. इंधनाचे दर कमी करून त्या जीएसटीच्या कक्षेत आणावे.
‘भारत बंद’च्या माध्यमातून  केंद्र सरकारचा निषेध  Through ‘Bharat Bandh’ Central government's protest
‘भारत बंद’च्या माध्यमातून  केंद्र सरकारचा निषेध  Through ‘Bharat Bandh’ Central government's protest

नाशिक : केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे व वीज क्षेत्राचे खासगीकरण विधेयक रद्द करावे. इंधनाचे दर कमी करून त्या जीएसटीच्या कक्षेत आणावे. स्वामिनाथन समितीच्या शिफारशीनुसार सर्व शेतीमालाला आधारभूत किमती व सरकारी खरेदीची हमी देणारा कायदा करावा, यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी (ता. २७) संयुक्त किसान कामगार मोर्चाच्या वतीने भारत बंदची घोषणा करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध पक्ष, शेतकरी संघटना यांनी एकत्र येत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.       भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, भाकप, आप, भारिप, बहुजन समाज पार्टी, यासह किसान सभा, बहुजन शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संघर्ष शेतकरी संघटना, छात्र भरती, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. शहर काँग्रेस कार्यालयापासून निषेध फेरी काढण्यात आली. या वेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. फेरीमार्गात रविवार कारंजा येथे कृषी कायद्यांच्या प्रती फाडून निषेध नोंदविला. हे कायदे काळे असल्याची संतप्त भावना व्यक्त करण्यात आली. समारोप प्रसंगी ६०० शहीद शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर अभिवादन करून सांगता झाली.  या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, ज्येष्ठ नगरसेवक शाहू खैरे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, ‘माकप’चे सुनील मालुसरे मुकुंद रानडे, ‘आयटक’चे दत्तू तुपे, राजेंद्र सावांदे, किसान सभेचे राज्य सचिव राजू देसले, ‘आप’चे शहराध्यक्ष गिरीश उगले, योगेश कापसे, माजी उपमहापौर गुलाम शेख, राकेश पवार, देविदास हजारे, विराज देवांग, शेतकरी समन्वय समितीचे प्रभाकर वायचळे आदी उपस्थित होते. किसान सभा व आयटक संघटना यांच्या नेतृत्वाखाली मनमाड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी किसान सभेचे जिल्हा संघटक विजय दराडे, साधना गायकवाड, देविदास भोपळे, शांताराम पवार, गोरख फोडसे, अण्णा सरोदे, अशोक काकड, श्रावण पवार, गणेश गंधाक्षे, भागा हलवर, मच्छिंद्र यमगर, नवनाथ फोडसे, काळू हालवर, विकास दराडे, तात्यासाहेब पानसरे आदी उपस्थित होते. बहुजन शेतकरी संघटनेने नाशिक रोड परिसरात एकत्र जमून निषेध केला. अध्यक्ष अशोक खालकर, रमेश औटे, धनाजी अरिंगळे, सुदाम बोराडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

बाजार समित्यांमध्ये कामकाज सुरळीत  नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाशवंत शेतमाल विक्रीसाठी येत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी बाजार समित्यांनी कामकाज सुरू ठेवले होते. मात्र बाजार समितीच्या वतीने भारत बंदला पाठिंबा देण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com