Agriculture news in marathi, Through centers in Ratnagiri district Purchase of 5935 quintals of paddy | Agrowon

रत्नागिरी जिल्ह्यात केंद्रांद्वारे ५९३५ क्विंटल भातखरेदी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जानेवारी 2022

रत्नागिरी ः जिल्ह्यात तयार होणारे भातपीक खरेदी-विक्री संघाकडून खरेदी करण्यात येते. सोमवारी ११ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील ५०२ शेतकऱ्यांकडून ५९३५.७५ क्विंटल भात खरेदी करण्यात आली आहे.

रत्नागिरी ः जिल्ह्यात तयार होणारे भातपीक खरेदी-विक्री संघाकडून खरेदी करण्यात येते. सोमवारी ११ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील ५०२ शेतकऱ्यांकडून ५९३५.७५ क्विंटल भात खरेदी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १४ केंद्रांवर भात खरेदी सुरू आहे. गतवर्षीपेक्षा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ‘खविसं’कडून सांगण्यात आले.

शेतकऱ्यांकडून शासन ठरवून देईल, त्या दराने शेतीमालाची खरेदी करून ती पुरवठा समितीकडे देणे, हे या संस्थेचे मुख्य काम आहे.  जिल्ह्यात या योजनेला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. २०१३-१४ मध्ये विक्रमी प्रतिसाद लाभला होता. त्या वर्षी २४ हजार ४९८.४६ क्विंटल भाताची खरेदी झाली होती. यासाठी शासनाने १३१० रुपये दर दिला होता. त्या वेळी जिल्ह्यातील १९५९ शेतकऱ्यांनी आपल्याकडील भाताची विक्री केली होती.

हा भात गोडाउनमध्ये शिल्लक राहिल्याने पुढील दोन वर्षे भाताची खरेदीच झाली नव्हती. गतवर्षी ११२२ शेतकऱ्यांनी १३ हजार २९५.०५ क्विंटल भाताची विक्री केली होती. मार्केटिंग फेडरेशनने क्विंटलला १७५० रुपये दराने याची खरेदी केली होती. 

खरेदी-विक्री संघ आणि विविध कार्यकारी सोसायट्यांतर्फे धान्याची खरेदी करण्यात येते. यासाठी जिल्ह्यात खेड तालुक्यात खेड, दापोली तालुक्यात दापोली आणि केळशी, गुहागर तालुक्यात गुहागर, रत्नागिरी तालुक्यात रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर, लांजा तालुक्यात लांजा, राजापूर तालुक्यात राजापूर आणि पाचल, चिपळूण तालुक्यात चिपळूण, मिरवणे, आकले, शिरगाव, शिरळ अशा १४ केंद्रांवर भाताची खरेदी करण्यात येते. खविसं’चे यंदाच्या वर्षी २२ हजार क्विंटल धान्य खरेदीचे उद्दिष्ट आहे. गत आठवड्यात ३ हजार ५९९ क्विंटल भाताची खरेदी करण्यात आली.


इतर बातम्या
उत्तर महाराष्ट्राला थंडीचा विळखा पुणे : उत्तर भारतातील गोठविणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे...
राज्यातील ५१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना...मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रजासत्ताक...
‘सीडी रेशो’ घसरलेल्या  जिल्ह्यांमध्ये...पुणे ः कर्जवाटप व ठेवीचे गुणोत्तर (सीडी रेशो)...
खराब झालेल्या सोलर  पॅनेलची नुकसान...गडचिरोली : धानोरा तालुक्यातील गिरोला येथील सुरेश...
रब्बी हंगामात ज्वारी घटली; हरभऱ्याची...पुणे : राज्यात रब्बीच्या ९८ टक्के पेरा पूर्ण झाला...
डिजिटल सात-बारा प्रकल्पातून जगताप यांची...पुणेः देशात चर्चित ठरलेल्या डिजिटल सात-बारा...
बाजारात तूर आवक वाढली; दरातही सुधारणा पुणेः देशातील बाजारांमध्ये तुरीची आवक वाढली आहे....
बाजारपेठेत नव्या बेदाण्याची प्रतीक्षा सांगली ः गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याला...
पुणे जिल्ह्यातील तीन हजार कामे...पुणे : जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या शंभर दिवस...
ऊसतोडणी रखडल्याने वैभववाडी, उंबर्डेत...सिंधुदुर्गनगरी ः वैभववाडी तालुक्यातील नादुरूस्त...
साताऱ्यात कृषिपंपांची वीज तोडणीचा धडाकासातारा : गेल्या १५ दिवसांपासून ग्रामीण भागात...
वंध्यत्व निवारण शिबिरातून दूध...नागपूर : ‘‘विदर्भ व मराठवाडा दूध विकास...
नाशिकच्या स्वयंम पाटील यास प्रधानमंत्री... नाशिक: जिल्ह्यातील स्वयंम पाटील याने क्रिडा...
वीजतोडणीमुळे शेतकरी संतप्त भंडारा : निवडणुकीचे निकाल लागताच सरकारने भंडारा...
‘महाबीज’चा सोयाबीन बियाणे देण्यास नकारसांगली ः खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याची कमतरता...
वीजपुरवठा सुरळीत करा; ‘बळिराजा’ची मागणीजालना : महावितरणने शेतकऱ्यांकडे थकबाकी दाखवून...
औरंगाबादमध्ये भूसंपादन मोबदल्यासाठी...औरंगाबाद : निम्न दुधना प्रकल्पाचा जलसाठा ५० टक्के...
बासमतीची निर्यात वाढण्याची शक्यता इराण आणि सौदी अरेबियाकडून होणारी बासमती तांदळाची...
राज्यात थंडीची लाट पसरणार :...पुणे : पाकिस्तान मार्गे देशाच्या पश्चिम...
गरीब कुटुंबांच्या उत्पन्नात ५३...आर्थिक उदारीकरणानंतर (Economic liberalization)...