Agriculture news in marathi Through the first round of Kisan Railway Transport of 70 tons of agricultural produce | Agrowon

`किसान रेल्वे’च्या पहिल्या फेरीद्वारे ७० टन शेतमालाची वाहतूक

टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

सोलापूर ः सोलापूर विभागातून सुरु झालेल्या किसान रेल्वेची पहिल्या फेरीची रेल्वे शुक्रवारी (ता.२१) नाशिककडे रवाना झाली. पुढे ही रेल्वे दानापूरकडे (बिहार) जाणाऱ्या किसान रेल्वेला जोडली जाणार आहे. सोलापूर विभागातून या रेल्वेसाठी सुमारे ७० टन शेतमालाची वाहतूक झाली. 

सोलापूर ः सोलापूर विभागातून सुरु झालेल्या किसान रेल्वेची पहिल्या फेरीची रेल्वे शुक्रवारी (ता.२१) नाशिककडे रवाना झाली. पुढे ही रेल्वे दानापूरकडे (बिहार) जाणाऱ्या किसान रेल्वेला जोडली जाणार आहे. सोलापूर विभागातून या रेल्वेसाठी सुमारे ७० टन शेतमालाची वाहतूक झाली. 

विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता आणि अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक व्ही. के. नागर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे या अधिकाऱ्यांनी  यासाठी विशेष प्रयत्न केले. सोलापूर विभागाच्या इतिहासात प्रथमच किसान रेल्वे (कोल्हापूर ते मुजफ्फरपूर) धावणार आहे. सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, बेलवंडी, अहमदनगर आणि बेलापूर स्थानकावरून पार्सल लोडिंग करत ही रेल्वे पुढे रवाना झाली.

या लोडिंगमध्ये सोलापूर विभागातून डाळिंब, शिमला मिरची, सीताफळ, नारळाची रोपे, लिंबू हे शेतमाला पाठवण्यात आले. सुमारे ७० टनाचेपर्यंतचे लोडिंग या गाडीतून झाले. यातून रेल्वेला एकूण ३ लाख ३२ हजार ५४० रुपयांचे उत्पन्न मिळाले.

या रेल्वेमुळे सोलापुर विभागातील शेतकऱ्यांचा नाशवंत माल कमी दरात, अतिजलद आणि सुरक्षित जाऊ शकणार आहे. शिवाय वाहतूक खर्चही आवाक्‍यात आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन रेल्वेच्या प्रशासन विभागाने केले.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
भारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...