दिंडोरी तालुक्यात गारपीट

दिंडोरी तालुक्यात गारपीट
दिंडोरी तालुक्यात गारपीट

नाशिक: दिंडोरी तालुक्यात परत एकदा गारपीट झाली आहे. त्यामुळे ऐन हंगामात द्राक्ष व टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका बसला आहे.  दिंडोरी तालुक्यातील उत्तर भागातील काही गावांना शुक्रवार (ता. ४) दुपारनंतर गारपीटसह आलेल्या पावसाने झोडपून काढले. वरखेडा, अवनखेड, परमोरी परिसरात गारपीट झाल्याने परिसरातील शेतपिके बाधित होऊन शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्याच्या वातावरणात नवीन तयार होत माल जिरणे, डावणी, अळी, बागा फेल जाणे यांसारख्या समस्यांनी द्राक्ष उत्पादक त्रस्त आहेत. मात्र गारपिटीच्या संकटाने परमोरी, आवनखेड व वरखेडा परिसरात गारपीट व पाऊस झाल्याने परिसरातील द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणावर बसला. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. द्राक्ष, टोमॅटो आदी पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अगोदरच झालेल्या जोरदार पावसामुळे येथील शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे त्यांचे पुढील हंगामातील नियोजन कोलमडले असून, त्यात या गारपिटीमुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. नाशिक तालुक्यातील दरी, मातोरी, मुंगसरे या भागातही पाऊस झाला. प्रमुख पिकाचे नुकसान 

  • द्राक्ष घड जिरण्याची समस्या वाढली आहे. 
  • घडधरणा झालेल्या बागेतील पाने चिरले, नवीन फुटीवर गर पडल्याने फुटी मोडल्या 
  • टोमॅटोचे उभारलेले मांडव जमीनदोस्त झाले  
  • टोमॅटोची झाडे जमीनदोस्त झाल्याने फळे खराब झाली 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com