agriculture news in Marathi, Thunderstorm in Dindori Taluka, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

दिंडोरी तालुक्यात गारपीट
टीम अॅग्रोवन
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

नाशिक: दिंडोरी तालुक्यात परत एकदा गारपीट झाली आहे. त्यामुळे ऐन हंगामात द्राक्ष व टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. 
दिंडोरी तालुक्यातील उत्तर भागातील काही गावांना शुक्रवार (ता. ४) दुपारनंतर गारपीटसह आलेल्या पावसाने झोडपून काढले. वरखेडा, अवनखेड, परमोरी परिसरात गारपीट झाल्याने परिसरातील शेतपिके बाधित होऊन शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नाशिक: दिंडोरी तालुक्यात परत एकदा गारपीट झाली आहे. त्यामुळे ऐन हंगामात द्राक्ष व टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. 
दिंडोरी तालुक्यातील उत्तर भागातील काही गावांना शुक्रवार (ता. ४) दुपारनंतर गारपीटसह आलेल्या पावसाने झोडपून काढले. वरखेडा, अवनखेड, परमोरी परिसरात गारपीट झाल्याने परिसरातील शेतपिके बाधित होऊन शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सध्याच्या वातावरणात नवीन तयार होत माल जिरणे, डावणी, अळी, बागा फेल जाणे यांसारख्या समस्यांनी द्राक्ष उत्पादक त्रस्त आहेत. मात्र गारपिटीच्या संकटाने परमोरी, आवनखेड व वरखेडा परिसरात गारपीट व पाऊस झाल्याने परिसरातील द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणावर बसला. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. द्राक्ष, टोमॅटो आदी पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

अगोदरच झालेल्या जोरदार पावसामुळे येथील शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे त्यांचे पुढील हंगामातील नियोजन कोलमडले असून, त्यात या गारपिटीमुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. नाशिक तालुक्यातील दरी, मातोरी, मुंगसरे या भागातही पाऊस झाला.

प्रमुख पिकाचे नुकसान 

  • द्राक्ष घड जिरण्याची समस्या वाढली आहे. 
  • घडधरणा झालेल्या बागेतील पाने चिरले, नवीन फुटीवर गर पडल्याने फुटी मोडल्या 
  • टोमॅटोचे उभारलेले मांडव जमीनदोस्त झाले  
  • टोमॅटोची झाडे जमीनदोस्त झाल्याने फळे खराब झाली 

इतर अॅग्रो विशेष
नागपूरच्या बाजारात भाव खाणारी सावळीची...बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने विविध...
संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीच्या हालचालीपुणे : बाजार समित्यांच्या जोखडातून शेतीमालाची...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे: अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि परिसरावर...
‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे थाटात...सोलापूर : ‘सकाळ ॲग्रोवन’च्या यंदाच्या दिवाळी...
२०१९ पशूगणना : गायींची संख्या १८...पुणे ः देशात २०१२ मध्ये ५१२ दशलक्ष पशुधन होते....
कर्जमाफीच्या गोंधळामुळे सोसायट्या संकटातसांगली ः कर्जमाफीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही....
मुद्रांक शुल्कात आठशे कोटींनी घटसोलापूर : मुद्रांक शुल्कातून २७ हजार कोटींच्या...
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
शेततळ्यातील पाण्यावर फुलले शेडनेटमधील...पावसाचे कायम दुर्भिक्ष, त्यामुळे शेती अर्थकारणाला...
राज्यात गाजर ११०० ते ८००० रुपये...जळगावात ११०० ते १८०० रुपये दर जळगाव कृषी...
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...