रब्बी हंगामात ज्वारी घटली; हरभऱ्याची झेप 

राज्यात रब्बीच्या ९८ टक्के पेरा पूर्ण झाला असून, ज्वारीच्या पेऱ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन लाख हेक्टरने घट झाली आहे. या उलट हरभऱ्याने मोठी झेप घेत आतापर्यंत २६ लाख हेक्टरहून जास्त क्षेत्र व्यापले आहे.
The tide fell during the rabbi season; The leap of the gram
The tide fell during the rabbi season; The leap of the gram

पुणे : राज्यात रब्बीच्या ९८ टक्के पेरा पूर्ण झाला असून, ज्वारीच्या पेऱ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन लाख हेक्टरने घट झाली आहे. या उलट हरभऱ्याने मोठी झेप घेत आतापर्यंत २६ लाख हेक्टरहून जास्त क्षेत्र व्यापले आहे.  कृषी विभागातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, राज्यात रब्बी पिकाखालील सरासरी क्षेत्र ५१ लाख हेक्टरच्या आसपास आहे. गेल्या हंगामात ५५ लाख हेक्टरच्या पुढे पेरा झाला होता. यंदा २१ जानेवारीअखेर पेरा ५५.१७ लाख हेक्टरच्या पुढे गेला आहे. मागील हंगामाच्या तुलनेत हा पेरा जवळपास सारखाच म्हणजे ९८.८२ टक्के इतका आहे.  राज्यात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १७.४३ लाख हेक्टर इतकेच आहे. मात्र, गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी २३ लाख हेक्टरवर पेरा नेला होता. यंदा हाच पेरा आतापर्यंत थेट २६.३५ लाख हेक्टरवर नेत शेतकऱ्यांनी आतापर्यंतच्या हरभऱ्याचे पेऱ्याचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत.  ‘‘राज्यात रब्बी ज्वारीचे क्षेत्र गेल्या हंगामाच्या तुलनेत ३-४ लाख हेक्टरने घटले आहे. कारण, स्वयंपाकघरातील प्रमुख धान्य म्हणून ज्वारीचा वापर घटला आहे. ते स्थान गव्हाने प्राप्त केले आहे. दुसऱ्या बाजूला चांगले बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना आता रब्बीत ज्वारी, गव्हापेक्षाही हरभरा अधिक फायदेशीर वाटतो आहे. त्यामुळे यंदा रब्बीमधील निम्मे क्षेत्र एकट्या हरभऱ्याने काबीज केले आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

प्रतिक्रिया  रब्बीचा पेरा यंदा सर्वसाधारणपणे गेल्या हंगामासारखाच दिसतो आहे. हरभरा हे राज्याचे आता प्रमुख पीक बनले आहे. खरिपात भाताची काढणी आटोपताच ते क्षेत्र जास्तीत जास्त रब्बी पिकाखाली कसे आणता येईल हेच आव्हान आता शेतकऱ्यांसमोर आहे.  -विनयकुमार आवटे, मुख्य सांख्यिकी, कृषी आयुक्तालय 

असे आहे राज्यातील रब्बी पेरण्यांचे चित्र 

पीक....चालू वर्षाचा पेरा (सर्व आकडे हेक्टरमध्येे) ज्वारी... १३७५४८८ गहू... १०१५२८७ मका... ३११७३१ हरभरा...८३८८०३  करडई... २०३१० जवस... ५६६२ तीळ... १५७१ सूर्यफूल...९०२९  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com