वनविभागाच्या कॅमेऱ्याने टिपला वाघ 

वनविभागाच्या कॅमेऱ्याने टिपला वाघ 
वनविभागाच्या कॅमेऱ्याने टिपला वाघ 

राळेगाव, यवतमाळ : राळेगाव तालुक्‍यातील आंजी गावशिवारात वाघाच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १ जानेवारीपासून आजवर सुमारे १३ जणांचे बळी या वाघाने घेतल्याने वनविभागाकडून ठिकठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले. या कॅमेऱ्यांनी दोन ठिकाणी वाघाला टिपले आहे. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

राळेगाव तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र आहे. या भागात वन्यप्राण्यांचा वावरदेखील त्यामुळे वाढीस लागला आहे. दरम्यान यावर्षी वाघाची प्रचंड दहशत या भागात आहे. जंगलानजीकच्या भागात शेतीकामासाठी जाणारे शेतकरी दचकून आहेत. वाघाच्या दहशतीची दखल वनविभागाकडून घेण्यात आली नाही. आंजी गावचे पोलिस पाटील मुकिंद डफ यांनी दखल घेऊन गावात दवंडीच्या माध्यमातनू शेतकरी व ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा दिला. 

दरम्यान, नागरिकांमध्ये वनविभागाविरोधात रोष वाढला. परिणामी वनविभागाने उशिरा दखल घेऊन कॅमेरे बसविले. त्यात वाघ कैद झाल्याने परिसरात वाघाचा वावर नागरिकांसाठी दहशतीचे कारण बनला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com