वाघ, बिबट्याच्या हल्ल्यात  चंद्रपुरात १८ जणांचा मृत्यू 

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची तसेच बिबट्यांची संख्या जास्त असल्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढल्या आहेत. मागील सहा महिन्यांत वाघ व बिबट्याच्या हल्ल्यामुळे जिल्ह्यात जवळपास १८ नागरिकांचा मृत्यू झाला.
वाघ, बिबट्याच्या हल्ल्यात  चंद्रपुरात १८ जणांचा मृत्यू  Tiger, leopard attack 18 killed in Chandrapur
वाघ, बिबट्याच्या हल्ल्यात  चंद्रपुरात १८ जणांचा मृत्यू  Tiger, leopard attack 18 killed in Chandrapur

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची तसेच बिबट्यांची संख्या जास्त असल्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढल्या आहेत. मागील सहा महिन्यांत वाघ व बिबट्याच्या हल्ल्यामुळे जिल्ह्यात जवळपास १८ नागरिकांचा मृत्यू झाला. तर, ५० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले. या पार्श्वभूमीवर मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेबाबत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.  ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली या क्षेत्रात एकूण ११७च्या वर वाघांची संख्या आहे. वन्यप्राण्यांकडून मानवी वस्तीत होणारे हल्ले रोखण्यासाठी तिन्ही तालुक्यातील जंगलव्याप्त गावातील परिसराला चेनलिंग फेंसिग करण्याची नागरिकांची मागणी आहे. ब्रह्मपुरी व सिंदेवाही तालुक्यातील जंगला लगतच्या गावांकरिता ३८ कोटी ६९ रुपयांच्या निधीचा प्रस्ताव तसेच सावली तालुक्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत जंगलालगतच्या गावांकरिता ४० कोटी रुपयांचा निधी मागणी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.  बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये उपस्थित होते. तर, प्रधान मुख्य वनसंरक्षक-वनबल प्रमुख जी. साईप्रकाश, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक एन. प्रवीण, जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश  संवेदनशील गावांमध्ये वैयक्तिक सौर कुंपण योजनेच्या सूचना त्वरित जारी करा  जन वन विकास योजनेत सध्याच्या ९३९ गावांसोबत आणखी गावांचा समावेश कर  वाघांचा सातत्याने वावर असलेल्या शेतीत बांबू, फळझाडे, चारा याची लागवड करण्याचे नियोजन करा  वनालगत असलेल्या पाच संवदेनशील गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वन सीमेवर लोखंडी जाळीचे कुंपण उभारा  वन्यजीवांच्या पाणवठ्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात २१८ ठिकाणी सोलर बोअरवेल तयार करून खोदतळे निर्माण करा  या कामांसाठी लागणारा सहा कोटी रुपयांचा खर्च कॅम्पा निधीतून करा 

पालकमंत्र्यांनी केलेल्या मागण्या  जंगलव्याप्त गावांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणे  परिसरातील वाघांचे इतर ठिकाणी स्थलांतर करणे  जन वन विकास योजनेत सावली तालुक्याचा समावेश करणे  इको-टुरिझम म्हणून या परिसरासाठी विकास निधी देणे  जंगलालगत असलेल्या शेताच्या मालकांना प्रति एकर दहा हजार रुपये अर्थसाहाय्य करणे   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com