Agriculture news in marathi, The Tilari canal burst again at Maneri | Agrowon

तिलारीचा कालवा पुन्हा मणेरी येथे फुटला

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 जानेवारी 2022

सिंधुदुर्गनगरी ः तिलारी धरणाचा डाव्या कालव्यावर असलेला उपकालवा बुधवारी (ता.१२) पुन्हा मणेरी येथे फुटला. या कालव्यातून वाहणारे हजारो लिटर पाणी शेतीत घुसले. त्यामुळे शेतीसह पिकांचे नुकसान झाले आहे.

सिंधुदुर्गनगरी ः तिलारी धरणाचा डाव्या कालव्यावर असलेला उपकालवा बुधवारी (ता.१२) पुन्हा मणेरी येथे फुटला. या कालव्यातून वाहणारे हजारो लिटर पाणी शेतीत घुसले. त्यामुळे शेतीसह पिकांचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे या परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. तिलारी धरणाचे कालवे फुटण्याचे सत्र सातत्याने सुरू आहे.

महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवरील तिलारी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात दोन्ही राज्यांतील अनेक गावे येतात. परंतु या धरणाचे कालवे सातत्याने फुटण्याचे प्रकार सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी गोव्याकडे जाणारा कालवा फुटल्यामुळे मोठे नुकसान झाले होते. या शिवाय काही दिवस पाणीदेखील बंद करण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच बुधवारी उपकालवा मणेरी येथे फुटला. या कालव्याला मोठे भगदाड पडले आहे. नव्याने पेरणी केलेल्या विविध पिकांचे नुकसान झाले आहे.

स्थानिक शेतकऱ्यांनी ही माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर उपअभियंता एस. डी. अंबी, एस .एस. सिंघवी हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कालव्याचे काम करीत असलेले ठेकेदार धनंजय पाटील यांना संपर्क साधून तत्काळ कालवा दुरुस्तीचे काम करण्याच्या सूचना केल्या. या कालव्याच्या सद्यःस्थितीची माहिती काही दिवसांपूर्वीच शेतकरी अजय कुबल यांनी अधिकाऱ्यांना दिली. धोका ओळखून दक्षता घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
 


इतर बातम्या
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...
‘अशोक’च्या निवडणुकीत ‘लोकसेवा’ची सत्ता...नगर ः श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
नगरमध्ये सहाशे शेतकऱ्यांना मिळणार... नगर ः शेतकऱ्यांना शेळीपालन, कुक्कुटपालन...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत विक्रमी पेरणीनांदेड : पावसाळ्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे...
शेतीमाल तारण योजनेत सात बाजार समित्याऔरंगाबाद : पणन मंडळाच्या औरंगाबाद विभागातील...
‘स्वाभिमानी’चे पीकविम्यासाठीचे ठिय्या...बुलडाणा : पीकविम्याच्या मुद्यावर चिखलीमध्ये...
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...