नाशिक जिल्हा बँकेकडून कर्ज वसुलीसाठी अटीतटीचे प्रयत्न

नाशिक जिल्हा बँकेकडून कर्ज वसुलीसाठी अटीतटीचे प्रयत्न
नाशिक जिल्हा बँकेकडून कर्ज वसुलीसाठी अटीतटीचे प्रयत्न

नाशिक : आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने धडक वसुली मोहीम हाती घेतली आहे. नाशिक तालुक्यातील सय्यद पिंप्री येथील २८ थकबाकीदारांच्या सुमारे ४० एकर क्षेत्राचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे.

शिलापूर येथील माधव रामचंद्र कहांडळ यांच्याकडे दोन लाख ६६ हजारांची थकबाकी आहे. १९९७ पासून थकबाकीदार असलेले कहांडळ यांच्या ५ एकर ११ गुंठे जागेचा जाहीर लिलाव केला जाणार आहे.

जिल्हा बँकेने मार्च महिन्यात सक्तीची वसुली मोहीम राबविण्यासाठी बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. नाशिक व निफाड सहकारी साखर कारखान्यांमुळे बँक एनपीएत गेली. निफाड कारखान्यांकडे १४० कोटींची थकबाकी आहे. या वसुलीसाठी कारखान्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली.

कारखान्यांच्या माजी संचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. बँकेने वसुलीसाठी जप्त करण्यात आलेला कारखाना विक्रीसाठी तीनदा निविदा काढल्या. मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर बँकेने निसाका भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा काढली. मात्र भाडेतत्त्वाची रक्कम जादा असल्याकारणाने भाडेतत्त्वावर घेण्यास कोणीही धजावले नाही. पर्यायाने हा प्रयत्न फसला. बँकेने पुन्हा थकबाकीदार असलेल्या कारखान्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. या मोहिमेअंतर्गत हा लिलाव केला जाणार आहे.

सय्यद पिंप्री येथील २८ थकबाकीदारांकडे ५४ लाख ६२ हजारांची थकबाकी आहे. त्यांना सात दिवसाची नोटीस बजावण्यात आली असून, त्यानंतर थकबाकीदारांनी थकीत रक्कम न भरल्यास त्यांच्या जमिनीचा लिलाव केला जाणार आहे. थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करून त्यांना ३० दिवसांची अंतिम मुदत दिली जाणार आहे. या थकबाकीदारांनी बँकेचे कर्ज न भरल्यास थेट त्यांच्या जमिनीचा जाहीर लिलाव करून ही रक्कम वसूल केली जाईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com