शेतकऱ्यांवर रब्बी ज्वारीचे पीक मोडण्याची वेळ 

शेतकऱ्यांवर रब्बी ज्वारीचे पीक मोडण्याची वेळ 
शेतकऱ्यांवर रब्बी ज्वारीचे पीक मोडण्याची वेळ 

औरंगाबाद : मकानंतर आता रब्बी ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्याचे पुढे येते आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या फतोलाबाद शिवारातील संदीप सोनवणे यांना आपल्या सात एकरातील रब्बी ज्वारीचे पीक लष्करी अळीचा प्रादुर्भाव व सततच्या पावसामुळे मूळं कुजू लागल्याने मोडून टाकण्याची वेळ आली आहे. 

संपूर्ण राज्यातील मका पिकावर यंदा लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. मोठे नुकसान केलेल्या या अळीचे नैसर्गीकरित्या काही ठिकाणी नियंत्रण झाल्याचेही पुढे आले होते. त्याचवेळी ही अळी तृणधान्यवर्गीय पिकांना लक्ष करीत असल्याची व मका हे तिचे आवडते पीक असल्याची माहिती पुढे आली होती. 

आता रब्बी हंगामात कमी अधिक प्रमाणात का होईना लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याच्या तक्रारी होत आहेत. गंगापूर तालुक्‍यातील सिंदी सिरजगाव, फतोलाबाद, रांजनगाव, सायगाव, खोजेवाडी, वडाची वाडी, शहापूर आदी शिवारातील रब्बी ज्वारीवर कमी अधिक प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्याची माहिती शेतकरी फतोलाबाद शिवारात शेती असलेले संदीप सोनवणे यांनी दिली. त्यांच्या स्वत:च्या सहा ते सात एकरांतील रब्बी ज्वारीवर लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. शिवाय ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या सततच्या पावसाने अजूनपर्यंत वापसा नसलेल्या शेतातील ज्वारी पिकाची मूळे कुजली होती. त्यामुळे आपण हे ज्वारीच्या पीक मोडण्याचा निर्णय घेतल्याचे संदीप सोनवणे म्हणाले. 

या शिवाय सिंदी सिरजगाव येथील शेतकरी विनायक सोनवणे यांनीही त्यांच्या पाच एकरांतील ज्वारीचे पीक मंगळवारी (ता. १२) मोडणे सुरू केले. या पिकाला लष्करी अळीने पोखरून टाकले. त्यामुळे ते सततच्या पावसामुळे जळून जात होते, असे सोनवणे म्हणाले. लष्करी अळीच्या प्रादुर्भावाकडे वा सततच्या पावसामुळे पीक जळून जात असल्याकडे कृषी विभागाच्या कुणीही लक्ष देण्याची तसदी घेतली नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. रब्बी ज्वारीसह पाच एकरांतील हरभराही सततच्या पावसामुळे जळून गेल्याने मोडण्याची वेळ आल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com