Agriculture news in marathi Time constraints in Nashik for essential establishments | Agrowon

जीवनावश्यक आस्थापनांनाही नाशिकमध्ये वेळेचे बंधन

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 एप्रिल 2021

कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ‘ब्रेक द चेन’ च्या अंतर्गत राज्य शासनाने कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले.  नागरिकांच्या विनाकारण फिरण्यावर आळा घालण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवर वेळेचे बंधन घातले आहे.

नाशिक : कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ‘ब्रेक द चेन’ च्या अंतर्गत राज्य शासनाने कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासह नागरिकांच्या विनाकारण फिरण्यावर आळा घालण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवर वेळेचे बंधन घालण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे दिली. 

‘ब्रेक द चेन’ या शासन आदेशानुसार जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना वगळता इतर बाबींचे आस्थापना बंद करण्याचे आदेश या पूर्वी काढण्यात आलेले आहेत. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ आणि शुक्रवारी रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत या कालावधीत योग्य कारणाशिवाय व परवानगी शिवाय कोणत्याही व्यक्तीस फिरण्यास मनाई करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने जीवनावश्यक बाबींवर काही वेळेचे बंधन असणे आवश्यक असल्याची बाब आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये आली. त्याप्रमाणे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व्यवस्थित रित्या उपलब्ध होतील व त्याचबरोबर संचारबंदी काळात नागरिक कोणत्याही कारणाने बाहेर पडणार नाहीत याचा योग्य मेळ साधून जीवनावश्यक बाबींच्या दुकानांवर सुद्धा वेळेबाबत काही निर्बंध लावण्याचे बैठकीत ठरले.

असे असतील निर्बंध  

  •   जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने, आस्थापना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत; मेडीकल, वैद्यकीय सेवा २४ तास 
  •   किराणा व भुसार मालाची दुकाने शनिवारी व रविवारी पूर्णत:बंद
  •   ज्या किराणा दुकानांमधून दूध अथवा भाजीपाला विक्री होते, अशा दुकानांसमोरील जागेत टेबलद्वारे दूध व भाजीपाला विकण्यास परवानगी 
  •   पूर्णपणे केवळ दूध भाजीपाला विकणारी दुकाने शनिवारी व रविवारी सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू
  •   शेती निविष्ठा आणि अवजारे यांच्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू 
  •   टायर विक्री, रिपेअर वर्कशॉप, सर्विस सेंटर आणि स्पेअरपार्ट विक्री आस्थापना सर्व दिवस (आठवडाभर) सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू; मात्र संबंधित पोलिस स्टेशनची परवानगी आवश्यक

इतर बातम्या
खतांची दरवाढ नाहीपुणे : रासायनिक खतांच्या किमतींमध्ये कोणत्याही...
खरिपाचे गावनिहाय नियोजन ः कृषिमंत्रीकोल्हापूर ः खरिपाचे नियोजन गावातच करण्यासाठी...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...
राज्यात कृषिपंपधारकांकडून १,१६० कोटींचा...कोल्हापूर : कृषिपंप वीज धोरण योजनेअंतर्गत ११ लाख...
पूर्व भारताच्या विकासावर भर ः पंतप्रधान...नवी दिल्ली ः देशाचा पूर्व भाग नेतृत्व करत होता,...
‘रोहयो’ शेततळ्यात प्लॅस्टिक...पुणे : रोजगार हमी योजनेतून शेततळे खोदण्यासाठी...
विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पंढरपुरात...सोलापूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना...
बाजारात गर्दी नियंत्रणासाठी नियमांची...नाशिक : कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यातील...
नेरूर येथे नारळ बागेला आगसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील नेरूर कर्याद नारूर (...
जोरदार पावसाची शक्यतापुणे : ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे. तसेच...
जळगावात बीटी कापसाच्या २५ लाख पाकिटांची...जळगाव :  राज्यात कापूस लागवडीत आघाडीवर...
दर्यापूर बाजार समितीत सोयाबीनला सात...अमरावती : सोयाबीन दरातील तेजीची घौडादौड कायम असून...
मंत्रिमंडळात विदर्भाचे वजन घटलेनागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख आणि वनमंत्री संजय...
नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे शेतकरी कृषी...कोल्हापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या...
 खानदेशात कांद्याची आवक वाढतच दर दबावातजळगाव :  खानदेशात गेल्या आठवड्यात लाल...
अकोला जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना...अकोला : एकीकडे केंद्र, राज्य शासन लाभार्थ्यांच्या...
प्राधान्यक्रम एका बाबीला, निवड दुसऱ्याच... नगर : कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी...
दर वाढले म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन...परभणी : दर वाढले म्हणून बियाण्यासाठी राखून...
अवकाळीचा आजपासून अंदाजपुणे : दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत ढगाळ...
सोलापुरात वाढत्या उन्हामुळे शुकशुकाटसोलापूर ः सोलापूर शहर जिल्हयात सध्या उष्ष्णतेची...